​ ‘भाऊजीं’ची नवी इनिंग, आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 01:46 PM2018-06-18T13:46:27+5:302018-06-18T19:16:27+5:30

 ‘भाऊजी’ म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेले अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना      ख-या अर्थाने सिद्धिविनायक पावला ...

'Bhaji's new Inning', Order Bandekar as state minister? | ​ ‘भाऊजीं’ची नवी इनिंग, आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा ?

​ ‘भाऊजीं’ची नवी इनिंग, आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा ?

googlenewsNext
 
भाऊजी’ म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेले अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना      ख-या अर्थाने सिद्धिविनायक पावला असे म्हणता येईल. होय, आदेश बांदेकर यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अर्थात अद्याप राज्य सरकारने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरचं ही घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अगदी अलीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात काही राजकीय वाटाघाटी झाल्या होत्या. शिवसेनेला राज्यात व केंद्रात आणखी मंत्रिपदे देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. याच पार्श्वभूमीवर आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. २०११ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी दादरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
अलीकडच्या काळात बांदेकर  अभिनय क्षेत्राऐवजी राजकारणात अधिक सक्रीय झाले होते. यादरम्यान त्यांनी सेनेत प्रवेश केला. सध्या ते शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळून आहेत. ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. या कार्यक्रमामुळे सगळे त्यांना ‘भाऊजी’ म्हणून ओळखतात.

Web Title: 'Bhaji's new Inning', Order Bandekar as state minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.