नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:31 PM2018-08-14T13:31:29+5:302018-08-14T13:37:57+5:30

सैराट या चित्रपटांतर नागराज मंजुळे कोणता चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना लागलेली आहे. नागराजच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Announcement of Nagraj Manjole's forthcoming film | नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा

नागराज मंजुळेच्या आगामी चित्रपटाची झाली घोषणा

googlenewsNext

नागराज मंजुळेने फॅन्ड्री द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतले. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्याचा पिस्तुल्या हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या लघुपटाची देखील प्रचंड चर्चा झाली होती. ‘सैराट’ या चित्रपटामुळे तर नागराज मंजुळेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांची मुख्य भूमिका असलेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटांतर नागराज कोणता चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना लागलेली आहे. नागराजच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

नागराज मंजुळेच्या आजवर सगळ्याच चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. आता झी स्टुडिओजच्याच साथीने तो प्रेक्षकांसाठी चित्रपट घेऊन येत आहे. झी स्टुडिओच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आले. ‘झी स्टुडिओज’च्या ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहिती देत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओच्या माध्यमातून या नव्या प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडिसोबतच लिहिण्यात आले आहे की, फँड्री, सैराट... नंतर झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे पुन्हा एकदा एकत्र... लवकरच... 

पण नागराज आणि झी स्टुडिओजच्या या आगामी चित्रपटाचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट कोणता असणार याबाबत गोपनीयता राखण्यात आली असल्याने त्याच्या फॅन्सना त्याच्या चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता लागली आहे.

नागराज मुंजुळेच्या चित्रपटांचे विषय हे नेहमीच समाजातील चालीरिती, तळागाळातील समाजांचे प्रश्न, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी यांच्यावर असतात. त्यामुळे नागराजचा हा आगामी चित्रपट देखील अशाच वेगळ्या विषयावर असणार असा तर्क सोशल मीडियावर नेटिझन्सकडून लावण्यात येत आहे. नागराजच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्याला या आगामी चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. 



 

Web Title: Announcement of Nagraj Manjole's forthcoming film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.