कधी पाहिलाय का अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा कुल अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 09:36 AM2017-03-29T09:36:51+5:302017-03-29T15:06:51+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जे काही करते ते काही हटकेच असतं.सोनालीची प्रत्येक अदा, तिचं सौंदर्य याची कायमच चर्चा होत असते. ...

Actually Sonali Kulkarni's total estimate of the never-seen actress | कधी पाहिलाय का अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा कुल अंदाज

कधी पाहिलाय का अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा कुल अंदाज

googlenewsNext
िनेत्री सोनाली कुलकर्णी जे काही करते ते काही हटकेच असतं.सोनालीची प्रत्येक अदा, तिचं सौंदर्य याची कायमच चर्चा होत असते. विविध सिनेमांमधील तिने साकारलेल्या भूमिका असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी तिने केलेली स्पेशल ड्रेसिंग स्टाईल असो, दरवेळी कॅमे-याच्या नजरा सोनालीकडे आपसुकच आकर्षित होत असतात. मराठी-हिंदी सिनेमा आणि रंगभूमी गाजवणारी ही मराठमोळी अभिनेत्री सध्या लंडनच्या वातावरणाचा आनंद घेत आहे. लंडनचं वातावरण ब-याचदा ढगाळ असल्याचे पाहायला मिळतं. मात्र लंडनमधल्या सनी डेचा आनंद घेत असल्याचा एक फोटो सोनालीनं नुकताच ट्विटरवर पोस्ट केला आहे. या आल्हाददायक वातावरणात सोनाली भलतीच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. लंडनच्या या वातावरणाचा आनंद घेत असताना तिचा चेहरासुद्धा चांगलाच खुलला आहे. सोनालीच्या सौंदर्यासह तिचा आकर्षक ड्रेससुद्धा तितकाच लक्षवेधी आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य आणखीच बहरल्याचे दिसतंय. आकर्षक ड्रेससोबतच तिचे इअर रिंगसुद्धा खास आहेत. खास फ्लॉअर डिझाईनचे हे इअर रिंग्स सोनालीच्या सौंदर्यात भर घालत आहेत. लंडनचं आल्हाददायक आणि सुखावणारं वातावरण, तितकाच आकर्षक आणि लक्षवेधी गुलाबी रंगाचा ड्रेस तसंच फुलांची नक्षी असलेले कानातले यामुळे सोनाली कुलकर्णीला सो कुल का म्हणतात याची प्रचिती तुम्हाला नक्कीच आली असेल. 

Web Title: Actually Sonali Kulkarni's total estimate of the never-seen actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.