आता भाऊ कदम 'लिफ्टमॅन' बनून घालणार दंगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 05:13 PM2018-07-27T17:13:30+5:302018-07-27T17:13:34+5:30

चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातून नावारूपाला आलेला आणि अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला लावणारा भाऊ कदम आता नव्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येत आहे.

liftman bhau kadams first web series on ZEE5 | आता भाऊ कदम 'लिफ्टमॅन' बनून घालणार दंगा!

आता भाऊ कदम 'लिफ्टमॅन' बनून घालणार दंगा!

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातून नावारूपाला आलेला आणि अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला लावणारा भाऊ कदम आता नव्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येत आहे. भाऊ आणि त्याचे जोक्स म्हणजे प्रेक्षकांसाठी हास्याची पर्वणीच असते. हिच हास्य जत्रा आता भाऊ आणखी एका नव्या माध्यमात घेऊन येणार आहे. ZEE5 वर भाऊची एक नवी कोरी वेबसिरीज येऊ घातली असून ‘लिफ्टमॅन’ असं या वेब सीरिजचं नाव आहे. 

एखाद्या ऑफिस बिल्डिंगचा लिफ्टमॅन प्रत्येक कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असतो. दररोज येणारी-जाणारी लोकं यांच्यासोबत त्या लिफ्टमॅनची भेट घडत असते. यादरम्यान भाऊ हा अतरंगी लिफ्टमॅन नक्की काय करणार, हे पाहणं मजेशीर असणार आहे. याआधी भाडिपाच्या अनेक वेब सीरिजमधून दिसलेली पॉला भाऊ कदमसोबत या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या देशी-विदेशी केमिस्ट्रितून प्रेक्षकांच धमाल मनोरंजन होणार यात काही शंकाच नाही. कारण भाऊ कदमच्या इंग्रजीची प्रचिती वेळोवेळी आपल्याला 'चला हवा येऊ द्या'च्या एपिसोडमधून येत असतेच.

महत्त्वाचं म्हणजे या बेव सीरिजच्या सर्व एपिसोडचे शूटिंग लिफ्टमध्ये झालं आहे. लिफ्ट या विषयाला मध्यभागी ठेवून त्याच्या अवतीभवती हे कलाकार काय गोंधळ घालणार आहेत. याचीही उत्सुकता पहायला मिळणार आहे. त्यामध्ये भाऊच्या विनोदाचे टायमिंग आणि पॉलाचा विदेशी ठसकाही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त अनेक पात्रांची लिफ्टमॅन असलेल्या भाऊशी पडलेली गाठ प्रेक्षकांची मन जिंकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Web Title: liftman bhau kadams first web series on ZEE5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.