"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:22 PM2024-05-17T15:22:12+5:302024-05-17T15:23:15+5:30

शिवसेनेत गेल्यानंतर किरण मानेंना मिळालेली लोकसभेची ऑफर, म्हणाले, "मी थेट मातोश्रीला फोन केला आणि उद्धवजींना..."

kiran mane said that a big pollitical party offer him lok sabha election 2024 | "मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

अनेक मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम करून अभिनेता किरण मानेंनी सिनेसृष्टीत त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं. बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी झाल्याने ते चर्चेत आले होते. काही महिन्यांपूर्वीच किरण मानेंनी शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजकरणात येण्यामागचं आणि शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं आहे. 

किरण मानेंनी नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनयातील करिअर आणि राजकारणावर भाष्य केलं. यावेळी एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेसाठी ऑफर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. ते म्हणाले, "व्यवस्था बदलायची असेल तर तुम्हाला राजकारणात यावं लागतं. यासाठी मी शिवसेनेत आलोय. या बदलाच्या प्रक्रियेत मला खारीचा वाटा असावा, असं मला वाटतं. मंत्रीपद मिळेल म्हणून तू गेला, असं मला अनेक जण म्हणाले. मी त्यांना सांगू इच्छितो की मला या लोकसभा निवडणुकीत एका महत्त्वाच्या मतदारसंघासाठी भारतातील खूप मोठ्या आणि जुन्या पक्षाने मला उमेदवारीची ऑफर दिली होती. हे जर मला शिवसेनेने सांगतिलं असतं तर मी कर्तव्य म्हणून निभावलं असतं. पण, तो पक्ष शिवसेना नव्हता. ही घटना फक्त त्या पक्षातील मला ऑफर देणारी मोठी व्यक्ती, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंना माहीत आहे."

"मी थेट मातोश्रीला फोन केला. उद्धवजींना मी हे सांगितलं. त्यांना हे आधीच कळलं होतं. त्यांना मी म्हटलं की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आणि शिवसेनेत आहे. शिवसेनेने सांगितलं तर मी ही जबाबदारी घेईन. अन्यथा मला हे नकोय. खरं तर तो पक्ष खूप मोठा होता. त्या मतदारसंघातून मी उभा राहिलो असतो तर ती राष्ट्रीय घडामोड झाली असती. मी तिथून निवडून आलो असतो तर खूप कॉन्ट्रोव्हर्सी आणि नाव झालं असतं. तरीही मी नाही म्हणून सांगितलं. कारण, मला शिवसेनेशी द्रोह करायचा नाही. मी विद्रोही आहे...द्रोही नाही. मला कुठल्याही पदाचा, धनाचा मोह नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरेंबरोबर राहणार," असंही किरण माने म्हणाले. 

Web Title: kiran mane said that a big pollitical party offer him lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.