टॉम क्रूजसोबत दिसणार जेनिफर कोनेली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 01:52 PM2018-07-23T13:52:42+5:302018-07-23T13:55:20+5:30

 सध्या टॉम क्रूज ‘टॉप गन : मावेरिक’ या हॉलिवूडपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता त्याच्या या चित्रपटाबद्दल एक ताजी माहिती आहे.

Jennifer Connelly in Early Talks to Join Tom Cruise in 'Top Gun' Sequel | टॉम क्रूजसोबत दिसणार जेनिफर कोनेली!

टॉम क्रूजसोबत दिसणार जेनिफर कोनेली!

googlenewsNext

हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूज याचे चाहते जगभर आहेत. टॉम क्रूजच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. सध्या टॉम ‘टॉप गन : मावेरिक’ या हॉलिवूडपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता त्याच्या या चित्रपटाबद्दल एक ताजी माहिती आहे.

 होय, टॉमच्या या चित्रपटात एका हॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झालीय आणि तिचे नाव आहे, जेनिफर कोनेली. टॉमच्या या चित्रपटात जेनिफर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे आणि या बातमीसोबतच प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. जोसेफ कोसिंस्की या चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय. जोसेफने याआधी ‘ओब्लिवियन’चे दिग्दर्शन केले होते आणि यासाठी जोसेफचे प्रचंड कौतुक झाले होते.
‘टॉप गन : मावेरिक’ हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

 जेनिफरबद्दल सांगायचे तर को-स्टार बिली कॅम्बेलसोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती चर्चेत आली होती. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर जेनिफरचे नाव फोटोग्राफर डेविड डुगनसोबत जोडले गेले. जेनिफरने लग्न करता डेविडच्या  मुलाला जन्मही दिला. पण तिचे हे नातेही तुटले. यानंतर २००३ मध्ये तिने अभिनेता पॉल बेटनीसोबत लग्न केले.

 

Web Title: Jennifer Connelly in Early Talks to Join Tom Cruise in 'Top Gun' Sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.