मराठी फिल्म इंडस्ट्री बदलतेय

By Admin | Published: February 26, 2016 03:45 AM2016-02-26T03:45:12+5:302016-02-26T03:45:12+5:30

बॉलीवूड, मराठी किंवा टॉलीवूड कोणतीही इंडस्ट्री असो, येथे घडणारा प्रत्येक बदल हा नेहमीच चांगला असतो. कारण बदल होणे म्हणजे यशस्वी होण्यासारखे असते. नेमका हाच

Changing Marathi Film Industry | मराठी फिल्म इंडस्ट्री बदलतेय

मराठी फिल्म इंडस्ट्री बदलतेय

googlenewsNext

बॉलीवूड, मराठी किंवा टॉलीवूड कोणतीही इंडस्ट्री असो, येथे घडणारा प्रत्येक बदल हा नेहमीच चांगला असतो. कारण बदल होणे म्हणजे यशस्वी होण्यासारखे असते. नेमका हाच बदल मराठी इंडस्ट्रीमध्येही होऊ लागला आहे. इंडस्ट्रीचे आताचे स्वरूप नक्कीच अभिमान वाटेल, असे आहे. बॉलीवूडमधील अजय देवगण, विद्या बालन, प्रियांका चोप्रा, संजय लीला भन्साली, अक्षय कुमार, अगदी सलमान खानची पावले आता मराठी इंडस्ट्रीकडे वळू लागली आहेत. हे पाहून वाटते मराठी इंडस्ट्री हे बाळ आता मोठे झाले आहे. या बाळाला म्हणजेच इंडस्ट्रीला अधिक चांगले घडविण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. अनेक समस्या आहेत, त्यावर खोलवर अभ्यास करून योग्य विचार समाजासमोर आणणे आवश्यक आहे. सामाजिक विचार व त्याची मांडणी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री, छान शूट, योग्य लोकेशनची निवड, अभिनयाचा चांगला परफॉर्मन्स अशा विविध व्हरायटी खास पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणल्या पाहिजेत. या माध्यमातून घडणारा जो बदल आहे त्यावर कोणत्याही प्रकारची टीका किंवा विरोध न करता या गोष्टींना प्रोत्साहन द्यावे. त्याचबरोबर तरुणांना अधिकाधिक प्लॅटफॉर्मदेखील दिला पाहिजे.
प्रेक्षकांचे म्हणाल, तर ज्याप्रमाणे मराठी कलाकार हा शॉर्ट फिल्म, मालिका, बॉलीवूड, हॉलीवूड अशा विविध माध्यमांतून स्वेच्छेने पुढे येत आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकदेखील स्वत:च्या पसंतीनुसार चित्रपट पाहत आहेत. भले ते सामाजिक, मनोरंजक किंवा व्यावसायिक असो. चित्रपट हिंदी असो वा मराठी, प्रेक्षक जर त्यांच्या आवडीनुसार पाहत असेल तर यात गैर काय? अरे... सबकी अपनी अपनी पसंद होती है. मराठी चित्रपट मुंबई, पुणे शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील रसातळापर्यंत पोहोचला पाहिजेच. तो जर महाराष्ट्राच्या कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचा असेल, तर सर्वांत पहिले ग्रामीण भागात थिएटर आहेत का? शहरात व ग्रामीण भागात कोणत्या प्रकारचे चित्रपट चालतात? या चित्रपटांचा तिकिटाचा दर प्रेक्षकांच्या खिशाला परवडणारा आहे का? या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या गोष्टी घडायला थोडा वेळ लागेल. पण हा जो होणारा बदल आहे त्याची वाट पाहावी. कारण बदल हा हळूहळूच होत असतो. इंडस्ट्री सध्या त्या मार्गावरच आहे.
कलाकारासाठी प्रेक्षक हे मायबाप असतात. कलाकारांना जर प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने, प्रत्यक्षात भेटता येत असेल, तर यासारखा दुसरा आनंद नाही. प्रेक्षकांनादेखील आपल्या आवडत्या कलाकाराला जवळून पाहण्याची संधी मिळते. तसेच त्यांना आपल्या आवडत्या कलाकाराचे कामदेखील जवळून पाहता येते. यामुळे साहजिकच प्रेक्षकदेखील कलाकारांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी नक्कीच चित्रपटगृहातदेखील जातील, असा विश्वासदेखील तिने सेलीब्रिटी रिपोर्टरमध्ये व्यक्त केला. मराठी इंडस्ट्रीची भरारी म्हणजेच एकाच आठवड्यात चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात. म्हणजेच या विविध चित्रपटांच्या माध्यमांतून वेगवेगळे नवीन विचार व अनेक व्हरायटी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच याविषयी इंडस्ट्रीमध्ये व्यासायिकदृष्ट्या तो समजूतदारपणा छान सांभाळलादेखील जातो. शेवटी चित्रपट हे प्रेक्षकांवर चालत असतात. बॉलीवूड व मराठी इंडस्ट्री ही पुरुषप्रधान आहे का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. पण माझ्या मते, कोणत्याही चित्रपटात अभिनेता किंवा अभिनेत्री महत्त्वाची नसते. त्या चित्रपटाची कथा महत्त्वाची असते. कारण प्रत्येक कलाकाराला चित्रपटाचा विषयच मोठा करीत असतो. इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार आहेत जे मिळालेल्या भूमिकेवर अभ्यास करून तो विषय, त्या चित्रपटातला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच कलाकार चित्रपटाला उंच शिखरावरदेखील पोहोचवितात. (शब्दांकन : बेनझीर जमादार)

मराठी इंडस्ट्रीची धकधक गर्ल
मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे. त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे. ‘लोकमत सीएनएक्स सेलीब्रिटी रिपोर्टर’ बनून मानसी संवाद साधत आहे...

 

Celebrity Reporter :
manasi naik

Web Title: Changing Marathi Film Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.