ऐकलंत का?, आलिया मिळवून देणार रणबीरला मेघना गुलजारचा 'हा' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 12:42 PM2018-08-04T12:42:31+5:302018-08-04T12:58:50+5:30

संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'ने अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास मदत केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संजूने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार केले आहेत. 

You know? Alia will get meghna gulzar thi movie to ranbeer | ऐकलंत का?, आलिया मिळवून देणार रणबीरला मेघना गुलजारचा 'हा' सिनेमा

ऐकलंत का?, आलिया मिळवून देणार रणबीरला मेघना गुलजारचा 'हा' सिनेमा

googlenewsNext
ठळक मुद्देसंजूनंतर रणबीर कपूर आणखीन एक बायोपिकमध्ये दिसू शकतोमेघना गुलजार सध्या एका नव्या बायोपिकच्या तयारीला लागली आहे

संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'ने अभिनेता रणबीर कपूर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास मदत केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संजूने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार केले आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार आता अनेक दिग्दर्शकांना रणबीर आपल्या सिनेमा साईन करायचे आहे. संजूनंतर रणबीर भारतीय सेनेचे फिल्ड मार्शल मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसू शकतो.  सध्या रणबीर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासह आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ब्रह्मास्त्र एक ट्रायोलॉजी चित्रपट आहे. म्हणजे, या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक असे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. याच्या पहिल्या भागाचे शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट २०१९ च्या १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

मानेकशॉ यांच्या बायोपिकबदल बोलायचे झाले तर मेघना गुलजार सध्या या बायोपिकच्या तयारीला लागली आहे. या सिनेमासाठी कास्टिंगचे काम सुरु झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार मेघना आणि आलियात यांच्या चांगली गट्टी जमली आहे. कास्टिंगसाठी मेघनाला आलिया मदत करतेय. सूत्रांच्या माहितीनुसार मेघनाला या बायोपिकसाठी रणबीरचे नाव आलियाने सुचवले आहे.  आलिया आणि रणबीर यांचं अफेअर आता कुणापासूनही लपलं नाहीये. दोघांच्याही चाहत्यांना त्यांचं एकत्र येणंही पसंत पडलं आहे. इतकंच काय तर रणबीरच्या कुटूंबियांनाही आलिया सून म्हणून पसंत असल्याचं वेळोवेळी दिसलं आहे. सगळे काही ठीक चालले तर लवकरच हे दोघे विवाहाच्या बेडीत अडकतील अशी आशा करायला हरकत नाही.

Web Title: You know? Alia will get meghna gulzar thi movie to ranbeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.