सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:58 AM2018-08-30T11:58:38+5:302018-08-30T12:28:39+5:30

रेणू आर्या सध्या काय करते, कुठे आहे हे कोणालाच माहीत नाहीये. सलमाननेच काही वर्षांपूर्वी रेणूविषयी माहिती एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली होती. सलमानला एका प्रवासाच्या दरम्यान रेणू विमानात भेटली होती.

When Salman Khan's first heroine met Renu Aari, Salman was the reaction | सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया

सलमान खानची पहिली नायिका रेणू आर्याला भेटल्यावर सलमानची ही होती प्रतिक्रिया

googlenewsNext

बिवी हो तो ऐसी या चित्रपटाला नुकतीच ३० वर्षं पूर्णं झाली. या चित्रपटाद्वारे सलमान खानने त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटानंतरच त्याला मैंने प्यार किया या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तो सुपरस्टार बनला. बिवी हो तो ऐसी या चित्रपटात सलमान खान साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटात रेखा, फारुक शेख यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात कादर खान, बिंदू यांसारखे ज्येष्ठ अभिनेते देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना रेणू आर्या ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. रेणू या चित्रपटात सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. रेणू गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. 

रेणू सध्या काय करते, कुठे आहे हे कोणालाच माहीत नाहीये. सलमाननेच काही वर्षांपूर्वी रेणूविषयी माहिती एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली होती. सलमानला एका प्रवासाच्या दरम्यान रेणू विमानात भेटली होती. पण रेणूत प्रचंड बदल झालेला होता. तिला ओळखणे देखील कठीण झाले असल्याचे सलमानने सांगितले होते. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील कोणीही तिला कधी शोधण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता असे देखील सलमानने मुलाखतीत सांगितले होते. तिला भेटून सलमानला खूप आनंद झाला होता. 

रेणूने देखील बिवी हो तो ऐसी या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर ती चांदनी, बंजारन या चित्रपटात झळकली. पण बॉलिवूडमध्ये यश मिळाले नसल्याने रेणू बॉलिवूडपासून दूर गेली. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या बंजारन या चित्रपटानंतर तिने कधीच काम केले नाही. रेणू आर्याची अभिनय कारकीर्द केवळ चार वर्षांची होती. पण त्या दरम्यान तिने रेखा, फारुख शेख, विनोद खन्ना, ऋषी कपूर, श्रीदेवी यांसारख्या दिग्ग्जांसोबत काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. बॉलिवूड मध्ये मिळालेल्या अपयशानंतर ती या प्रकाशझोतापासून कायमची दूर निघून गेली. ती सध्या कुठे आहे याची कोणालाच माहिती नाहीये. 
 

Web Title: When Salman Khan's first heroine met Renu Aari, Salman was the reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.