अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी केली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 09:00 PM2019-04-28T21:00:00+5:302019-04-28T21:00:00+5:30

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

This is what Ananya Pandey made to debut in Bollywood | अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी केली ही गोष्ट

अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी केली ही गोष्ट

googlenewsNext


बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अनन्या पांडेने विचारपूर्वक बॉलिवूडची निवड केली आहे. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या हेतूने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत.

अनन्या पांडे हिला आधीपासून अभिनय क्षेत्राची आवड होती. याबाबत तिने पालकांना सांगितले. पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करायला सांगितले. मात्र एका कार्यक्रमात अनन्याने केलेल्या अॅक्टमध्ये तिचा अभिनय पाहून तिचे वडील म्हणजेच अभिनेता चंकी पांडेने ती अभिनय क्षेत्रात काम करू शकते असे सांगितले होते, हे अनन्याने एका मुलाखतीत सांगितले.


बॉलिवूडमध्ये करियर करायचे मनाशी पक्के असल्यामुळे अनन्याने शालेय व महाविद्यालयीन जीवनात हिंदी भाषेची निवड केली होती व कत्थकचेही प्रशिक्षण घेतल्याचे तिने सांगितले. 


अनन्या पांडेसोबत 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटात तारा सुतारियाटायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर निर्मित व पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमा १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

अनन्या फक्त २० वर्षांची आहे. परंतु फॅशन आणि स्टाइलबाबत असलेली तिची चॉइस अत्यंत क्लासी आहे. सेक्सी आउटफिट्ससोबतच ट्रेडिशनल आउटफिट्स ती एकदम हटके स्टाइलमध्ये कॅरी करते.

तिच्या याच अदांवर तरूणांसोबतच तरूणीही फिदा आहेत. अनन्या आपली स्टाइल आणि फॅशन स्टेटमेंटमार्फत बॉलिवूडमध्ये आधीपासूनच आपली वेगळी जागा तयार करणाऱ्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांना टक्कर देत आहे.

दरम्यान, अनन्या पांडे 'स्टुडंट ऑफ द ईयर २' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कार्तिक आर्यन सोबत 'पति पत्नी और वो' हा चित्रपटदेखील साईन केला आहे. 

Web Title: This is what Ananya Pandey made to debut in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.