WATCH Video : अन् रिअ‍ॅलिटी शोतील टास्कमुळे असा भडकला किंगखान शाहरूख खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2017 10:46 AM2017-06-04T10:46:31+5:302017-06-04T16:16:31+5:30

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान तसा भलताच कूल अभिनेता. पण चुकीचे काही घडले की, शाहरूख भडकणार, हे अगदी पक्के. अलीकडे एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये याचा प्रत्यय आला.

WATCH Video: Shah Rukh Khan, Shah Rukh Khan! | WATCH Video : अन् रिअ‍ॅलिटी शोतील टास्कमुळे असा भडकला किंगखान शाहरूख खान!

WATCH Video : अन् रिअ‍ॅलिटी शोतील टास्कमुळे असा भडकला किंगखान शाहरूख खान!

googlenewsNext
लिवूडचा बादशहा शाहरूख खान तसा भलताच कूल अभिनेता. पण चुकीचे काही घडले की, शाहरूख भडकणार, हे अगदी पक्के. अलीकडे एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये याचा प्रत्यय आला. हा रिअ‍ॅलिटी शो अरब देशांत बराच लोकप्रीय आहे. अनेक अरब देशांतील सेलिब्रिटी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. शाहरूख या शोमध्ये पाहुण कलाकार म्हणून हजर होता. अबू धाबी येथे एका दुर्गम भागात शोचा सेट लागला होता. शाहरूख याठिकाणी हेलिकॉप्टरने पोहोचला. तेथून उंटावर बसून त्याला पुढे वाळवंटात नेण्यात आले. सेटवर शाहरूखचे भव्य स्वागतही झाले. यानंतर शूटींग सुरू झाले. पण हे काय, अचानक शाहरूखचा पारा चढला. याचे कारण म्हणजे, शोमधील एक टास्क़
 शोमधील दोन स्पर्धकांसोबत शाहरुखला गाडीने वाळवंटात नेण्यात आले आणि गाडीचा चालक अचानक गायब झाला. चालक गायब झालेला पाहून शाहरुख आणि अन्य दोन स्पर्धक गाडीतून बाहेर पडले. पण अचानक ते तिघेही याठिकाणच्या दलदलीत फसले. यातील  स्पर्धकाला दलदलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक एक भयंकर प्राणी या तिघांच्या दिशेने यायला लागला.  शाहरुखसह इतर दोन्ही स्पर्धक कमालीचे घाबरले. इतके की त्यांची बोबडीच वळली. 



काही वेळाने हा प्राणी खरा नसून तो खोटा होता आणि  हा सगळा प्रकार शोचाच एक भाग होता हे, शाहरूखला कळले. मग काय,शाहरुख त्या अ‍ँकरवर भलताच भडकला. दलदलीतून या तिघांना बाहेर काढल्यानंतर शाहरुख शोच्या अँकरला जवळपास मारायलाच धावल्याचे संबंधित व्हीडिओमध्ये दिसत आहे. मी भारतातून हे असले प्रकार करण्यासाठी इथे आलो का ? असा प्रश्नही शाहरुखने त्याला केला. मग काय, अँकरने अनेकदा माफी मागितली. पण शाहरूख बधला नाही. तो इतका संतापला की, शो सोडून तडक निघून गेला.

Web Title: WATCH Video: Shah Rukh Khan, Shah Rukh Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.