पटाखा! सुुनील ग्रोव्हर देतोय एका साडीवर एक पेटीकोट फ्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 11:26 AM2018-08-12T11:26:19+5:302018-08-12T11:28:12+5:30

विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपटाचे नाव आहे,‘पटाखा’. सध्या ‘पटाखा’ची जोरदार चर्चा सुरू आहे, ती या चित्रपटाच्या एकापाठोपाठ एक रिलीज करण्यात आलेल्या पोस्टर्समुळे. 

vishal bhardwaj film pataakha posters released sunil grover radhika madan sanya malhotra in different avatars | पटाखा! सुुनील ग्रोव्हर देतोय एका साडीवर एक पेटीकोट फ्री!!

पटाखा! सुुनील ग्रोव्हर देतोय एका साडीवर एक पेटीकोट फ्री!!

googlenewsNext

विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपटाचे नाव आहे,‘पटाखा’. सध्या ‘पटाखा’ची जोरदार चर्चा सुरू आहे, ती या चित्रपटाच्या एकापाठोपाठ एक रिलीज करण्यात आलेल्या पोस्टर्समुळे. या आगळ्यावेगळ्या पोस्टर्सनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचे एक कॅरेक्टर आणि सोबत चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे वर्णन करणारे कॅप्शन, अशी ही पोस्टर्स आहेत. यातील एका पोस्टर्सवर कॉमेडियन सुनील ग्रोव्हर दिसतोय. 

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही सुनीलने हे पोस्टर शेअर केले आहे. यात तो एका महिलेच्या गेटअपमध्ये आहे. ‘डिप्पर नारदमुणि, भैण की मम्मी...एक साडी के साथ एक पेटीकोट फ्री...’ अशी पंचलाईन त्याच्या या पोस्टरवर लिहिलेली आहे.


‘दंगल’फेम सान्या मल्होत्रा यात एका आगळ्या-वेगळ्या अवतारात आहे. ‘गेंदा कुमारी छुटकी़ कुतिया को अंग्रेजी में क्या कहवैं,’ असे तिच्या पोस्टरवर लिहिलेले आहे.

 राधिका मदान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.  छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर ती एन्ट्री घेते आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या भावी भविष्यासाठी अनेकार्थाने महत्त्वाचा आहे.तिचेही पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘चम्पा कुमारी बडकी, बापखाणी की चुडैल,’ अशी पंचलाईन तिच्या या पोस्टरवर लिहिलेली दिसतेय.  
राधिकाचा बॉलिवूडशी कुठलाही संबंध नाही. म्हणजेचं, तिने अतिशय संघर्षाने स्वबळावर अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.  ‘पटाखा’ हा चित्रपटही राधिकाला याच मेहनतीच्या जोरावर मिळाला. या चित्रपटासाठी ६० मुलींचे आॅडिशन घेतले गेले होते. यातून राधिकाची निवड झाली. 
एकंदर काय तर ‘पटाखा’चे पोस्टर मजेशीर आहेत, तितकेच इंटरेस्टिंग आहेत. या पोस्टरनी ‘पटाखा’बद्दलची उत्सुकता वाढली आहे. 

 

Web Title: vishal bhardwaj film pataakha posters released sunil grover radhika madan sanya malhotra in different avatars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.