Video: जैसलमेरच्या वाळवंटात खिलाडी अक्षय कुमार सायकल चालवतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 03:16 PM2018-10-03T15:16:55+5:302018-10-03T15:19:39+5:30

सायकल चालवताना कोणीही स्वतःला इजा होईल असा प्रयत्न करू नये असेही आवाहन केले आहे. तसेच आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे असेही त्याने म्हटले आहे.

Video: When Akshay Kumar runs a player in Jaisalmer's desert | Video: जैसलमेरच्या वाळवंटात खिलाडी अक्षय कुमार सायकल चालवतो तेव्हा...

Video: जैसलमेरच्या वाळवंटात खिलाडी अक्षय कुमार सायकल चालवतो तेव्हा...

googlenewsNext

बॉलिवूड कलाकार हे अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारा अभिनेता म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. अक्षयला सायकलिंगचीही आवड आहे. 



 

खिलाडी अक्षय कुमारचा आणखीन एक सिनेमा रूपेरी पडद्यावर येतोय. या सिनेमासाठी अक्षय प्रचंड मेहनत घेत आहे. 'हाऊसफुल ४’ च्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. सध्या सिनेमाचे शूटिंग राजस्थानमधील जैसलमेर येथे सुरु असून अक्षय सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. शूटिंगमधून वेळ मिळताच तो सेटवरील फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा आणखीन असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ खुद्द अक्षय कुमारनेच चाहत्यांसह शेअर केला आहे. 


या व्हिडिओमध्ये अक्षय भर वाळवंटामध्ये सायकल चालवतांना दिसत आहे. विशेष म्हणजे सायकल चालवताना तो काही स्टंटदेखील करतना पााहयला मिळत आहे.  या व्हीडीओला अक्षयने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.  ‘Life is about Balance & Stability, as Functional as this may be, PLEASE don’t try this on the Roads’अशी कॅप्शन देत सायकल चालवताना कोणीही स्वतःला इजा होईल असा प्रयत्न करू नये असेही आवाहन केले आहे. तसेच आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे असेही त्याने म्हटले आहे.

आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात. स्वत:ला एकाच चौकटीत बांधून न ठेवता   अनेक त-हेच्या चित्रपटांची निवड केली. अगदी अ‍ॅक्शन, कॉमेडी पासून हॉरर कॉमेडीपर्यंत अशा अनेक जॉनरचे चित्रपट त्याने केलेत. मध्यंतरी अक्षय सोशल मुद्यांवरच्या अनेक चित्रपटात दिसला. यानंतर आता तो पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. होय, २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘कंचना- मुनी2’ या तामिळ हॉरर कॉमेडीच्या हिंदी रिमेकमध्ये अक्की झळकणार आहे.
 

Web Title: Video: When Akshay Kumar runs a player in Jaisalmer's desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.