Video : ‘सिम्बा’चे फर्स्ट सॉन्ग ‘आंख मारे...’ रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:14 PM2018-12-06T12:14:59+5:302018-12-06T12:15:42+5:30

रणवीर सिंग व सारा अली खान यांच्या बहुप्रतिक्षीत ‘सिम्बा’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झालेय. होय, ‘आंख मारे...’ असे या गाण्याचे बोल आहेत.

Video: ranveer singh and sara ali khan Simmba first song aankh marey OUT | Video : ‘सिम्बा’चे फर्स्ट सॉन्ग ‘आंख मारे...’ रिलीज!

Video : ‘सिम्बा’चे फर्स्ट सॉन्ग ‘आंख मारे...’ रिलीज!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सिम्बा’चे हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे.

रणवीर सिंगसारा अली खान यांच्या बहुप्रतिक्षीत ‘सिम्बा’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झालेय. होय, ‘आंख मारे...’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘सिम्बा’चे हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे. गाण्यात काही ठिकाणी कुमार सानूचा आवाजही आहे. ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’ हे ओरिजनल गाणे कुमार सानू यांनी गायले होते.


दिग्दर्शक रोहित शेट्टीने  हे गाणे नव्या अंदाजात शूट केले आहे. अर्थात गाण्यातील डान्स मुव्ह सामान्य आहेत. काही डान्स स्टेप्स तर ८० व ९० व्या दशकातील आहेत. अर्थात यालाही एक कारण आहे. ‘आंख मारे’ हे गाणे मुळातच मस्तीने थिरकायला लावणारे गाणे आहे. त्यामुळे गाण्यात डान्स स्टेप्स सामान्य ठेवण्यात आल्या आहेत. अर्थात तरिही हे गाणे लोकांना आवडले आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासात हजारो लोकांनी हे गाणे पाहिले.

(अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे )

‘सिम्बा’ हा सारा अली खानचा दुसरा चित्रपट आहे. पण ‘आंख मारे’ हे कदाचित साराला मिळालेले तिच्या करिअरमधील पहिले ब्लॉकबस्टर गाणे आहे. यातील रणवीरची जबरदस्त स्टाईलही पाहण्यासारखी आहे. हे गाणे तुम्हीही पाहा आणि किती आवडले, ते आम्हाला नक्की कळवा.
 या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे. ‘सिम्बा’हा  चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे.  येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Web Title: Video: ranveer singh and sara ali khan Simmba first song aankh marey OUT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.