वरूण धवन म्हणतो, यंदा कर्तव्य नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:20 PM2019-03-29T20:20:00+5:302019-03-29T20:20:00+5:30

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो वरूण धवन आणि नताशा दलाल लवकरच विवाह करणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. मात्र याबाबतचा खुलासा वरूण धवनने केला आहे.

varun-dhawan-on-marrying-girlfriend-natasha-dalal-it-is-not-going-to-happen-this-year | वरूण धवन म्हणतो, यंदा कर्तव्य नाही!

वरूण धवन म्हणतो, यंदा कर्तव्य नाही!

googlenewsNext

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो वरूण धवन आणि नताशा दलाल बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक आहेत. नुकतेच असे वृत्त आले होते की ते दोघे लवकरच विवाह करणार आहेत. मात्र याबाबतचा खुलासा वरूण धवनने केला आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो वरूण धवन आणि नताशा दलाल बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक आहेत. दोघांमध्ये खूप चांगली बॉण्डिंग पाहायला मिळते. कित्येक वर्ष ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहे. ते दोघे नेहमी एकत्र दिसतात. त्यात काही दिवसांपूर्वी ते दोघे यावर्षी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. नुकताच वरूणने याबाबत खुलासा केला आहे.

वरूण धवनने नताशासोबतच्या लग्नाचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्याने सांगितले की, असे नाही की मी लग्न करणार नाही. पण, यावर्षी लग्न करणार नाही आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत वरूण धवनने स्पष्ट केले की, यावर्षी मी लग्न नाही करत आहे. मी लग्न करणारच नाही, असे म्हणत नाही. पण इतक्या लवकर लग्न करणार नाही. त्यासाठी मला योग्य वेळ शोधण्याची गरज आहे. 
करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करणमध्ये वरूण धवनने नताशाला डेट करत असल्याचे कबूल केले होते. त्याने सांगितले होते की, मी नताशा डेट करतो आहे आणि तिच्यासोबत लग्न करण्याची प्लानिंगदेखील करत आहे. करणने वरूणला विचारले की, तू लग्न कधी करणार आहेस, त्यावर वरूण म्हणाला की, मी कोणत्या सेलिब्रेटी कपलसोबत स्पर्धा करत नाही.
वरूण धवनच्या प्रोफेशनल कामाबद्दल सांगायचे तर सध्या वरूण रेमो डिसूझा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सरचे चित्रीकरण करतो आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर व नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त वरूण करण जोहरच्या कलंक चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मनने केले असून यात वरूणसोबत माधुरी दीक्षित नेने, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, आलिया भट व सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: varun-dhawan-on-marrying-girlfriend-natasha-dalal-it-is-not-going-to-happen-this-year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.