स्वित्झर्लंडमध्ये तैमूर अली खान करतोय हॉलिडे एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 07:00 AM2017-12-29T07:00:25+5:302017-12-29T12:31:15+5:30

तैमूर अली खानसाठी डिसेंबरचा पहिला महिना हॉलिडे सारखे आहे. सगळ्यात आधी या महिन्यात त्यांने पतौडी पॅलेसमध्ये आपला पहिला बर्थ ...

Timur Ali Khan is doing Hollywood Holiday in Switzerland | स्वित्झर्लंडमध्ये तैमूर अली खान करतोय हॉलिडे एन्जॉय

स्वित्झर्लंडमध्ये तैमूर अली खान करतोय हॉलिडे एन्जॉय

googlenewsNext
मूर अली खानसाठी डिसेंबरचा पहिला महिना हॉलिडे सारखे आहे. सगळ्यात आधी या महिन्यात त्यांने पतौडी पॅलेसमध्ये आपला पहिला बर्थ डे सेलिब्रेट केला. त्यानंतर ख्रिसमस पार्टीसाठी तो मुंबईत आला. ख्रिसमस पार्टीमध्ये मस्ती करतानाचे तैमूरचे मामा रणवीर कपूरसोबतचे फोटो देखल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तैमूर मम्मी-पप्पासोबत यूरोपमध्ये गेला आहे. 

करिना कपूर खान आणि सैफ अली खान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यूरोपला गेले आहेत. त्यांच्या सोबत तैमूर देखील गेला आहे. पतौडी फॅमिलेचे नव्या वर्षाचे स्वागताचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. तैमूर पहिल्यांदाच युरोप मधला स्नो फोल एन्जॉय करतोय. हा फोटो बघून आपण अंदाज लावू शकतो की तैमूर न्यू-इअरच्या पार्टीत मस्तीच्या मूडमध्ये आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की येणाऱ्या दिवसात तैमूरच्या फॅन्सना त्याचे अनेक फोटो पाहायला मिळणार आहेत. तैमूरच्या जन्मानंतर करिनाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.    

ALSO READ :  तैमूरने असा कापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाचा केक; मावशी करिष्मा कपूरने शेअर केले फोटो!

करिना कपूर आणि सैफ अली खान सध्या दोघे ही आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच सैफच्या 'कालाकांडी' चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचा टीजर रिलीज झाला आहे. त्यामुळे दोघांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तैमूरसोबत व्हेकेशनवर गेले आहेत. वीरे दी वेडिंगचे शूटिंग सुरु करण्याआधी ही करिना सैफ आणि तैमूर स्वित्झर्लंड व्हेकेशन एन्जॉय करायला गेले होते.  वीरे दी वेडिंग’  चित्रपटात करिना कपूर शिवाय सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. 

Web Title: Timur Ali Khan is doing Hollywood Holiday in Switzerland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.