Tanushree Dutta Controversy : तनुश्रीच्या वकिलांनी सीमी सिद्दीकींवर केला 'हा' आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:15 PM2018-10-09T20:15:34+5:302018-10-09T20:22:55+5:30

तनुश्रीच्या वकिलांनी आता हॉर्न ओके प्लीज सिनेमाचे निर्माते सीमी सिद्दीकींवर आरोप केला आहे. सामी सिद्दीकी हे दुसऱ्यांदा FIR दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत अशी माहिती तनुश्रीच्या वकिलांनी दिली आहे.

Tanushree Dutta Controversy: Tanushree's lawyers make this accusation on simi Siddiqui | Tanushree Dutta Controversy : तनुश्रीच्या वकिलांनी सीमी सिद्दीकींवर केला 'हा' आरोप

Tanushree Dutta Controversy : तनुश्रीच्या वकिलांनी सीमी सिद्दीकींवर केला 'हा' आरोप

googlenewsNext
ठळक मुद्दे 'सामी सिद्दीकी दुसऱ्यांदा FIR दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव टाकतायेत' तनुश्रीचा जबाब महिला पोलिस अधिकारी पुन्हा नोंदवणार

तनुश्री दत्ता प्रकरणाला रोज एक नवं वळण लागताना आपण पाहतो आहे. तनुश्रीच्या वकिलांनी आता हॉर्न ओके प्लीज सिनेमाचे निर्माते सीमी सिद्दीकींवर आरोप केला आहे. सामी सिद्दीकी हे दुसऱ्यांदा FIR दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत अशी माहिती तनुश्रीच्या वकिलांनी दिली आहे. तनुश्रीचा जबाब पुन्हा एकदा नोंदवण्यात येणार आहे. 
 
तनुश्रीचे वकिलांनी सांगितले, तनुश्रीला पुन्हा एकदा बोलवून एका महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे. मात्र निर्माते सामी सिद्दीका दुसऱ्यांदा  FIR दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. आमच्याकडे ठोस पुरावे आहेत आणि साक्षीदारांची यादीसुद्धा तयार असल्याते वकील एन. सातपुते यांनी सांगितले आहे.  दरम्यान तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. आयोगाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात असा सवालदेखील आयोगाकडून विचारण्यात आला आहे. तनुश्री दत्ता यांच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तनुश्री दत्ता यांनी स्वत: आयोगासमोर उपस्थित राहून त्यांचं म्हणणं मांडावं, अशी सूचना आयोगानं केली आहे.      

तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीनंतर महिला आयोगानं अभिनेता नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस पाठवली. या चौघांना 10 दिवसांमध्ये आपली बाजू मांडण्याच्या सूचना आयोगानं केली आहे. 

Web Title: Tanushree Dutta Controversy: Tanushree's lawyers make this accusation on simi Siddiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.