‘त्या’ घटनेने वाढवली करिना-सैफची चिंता! आता लेकासाठी नेमणार बॉडीगार्ड्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:15 AM2018-08-13T11:15:34+5:302018-08-13T11:16:11+5:30

तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. पण सध्या करिना आणि सैफ तैमूरच्या काळजीने चिंतीत आहेत. 

Taimur Ali Khan to get a bodyguard? | ‘त्या’ घटनेने वाढवली करिना-सैफची चिंता! आता लेकासाठी नेमणार बॉडीगार्ड्स!!

‘त्या’ घटनेने वाढवली करिना-सैफची चिंता! आता लेकासाठी नेमणार बॉडीगार्ड्स!!

googlenewsNext

 तैमूर अली खान कुठल्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या या लाडक्या लेकाचे फॅन फॉलोर्इंग दिवसेंदिवस वाढते आहे, तैमूर दिसला रे दिसला की, पापाराझींचे कॅमेरे त्याची छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूरने आपल्या क्यूट लूकमुळे इंटरनेटवर सनसनी निर्माण केली आहे. वास्तविक क्यूट लूकबरोबरच तो त्याच्या नावामुळेही प्रचंड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीला त्याचे हेच नाव वादाचा विषय बनले होते. परंतु आज प्रत्येकाच्या तोंडी त्याचे नाव आहे. खरे तर तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रीयतेत जराही कमी आलेली नाही. पण सध्या करिना आणि सैफ तैमूरच्या काळजीने चिंतीत आहेत. 

काल-परवाच्या घटनेने करिना व सैफची चिंता वाढवली आहे, काल-परवा तैमूर नॅनीसोबत बाहेर पडला असता एका अज्ञात इसमाने तैमूरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, नॅनीने त्या इसमाला क्षणात हुसकावून लावले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण या घटनेनंतर करिना व सैफला तैमूरबद्दल काळजी वाटू लागली आहे. यावर उपाय म्हणून तैमूरसाठी स्वतंत्र बॉडीगार्ड नेमण्याचा निर्णय करिना व सैफने घेतल्याचे कळतेय. म्हणजे लवकरच तैमूरसोबत बॉडीगार्ड फिरताना दिसतील.

Web Title: Taimur Ali Khan to get a bodyguard?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.