आई करीनाच्या कुशीत जाण्यासाठी चिमुकल्या तैमूरचा हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 07:12 AM2018-03-15T07:12:12+5:302018-03-15T12:42:12+5:30

बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा होणं काही नवं नाही. मग सुपरस्टार्सच्या मुला-मुलींची बॉलिवूडमध्ये एंट्री असो किंवा त्यांचं खासगी जीवन.त्यांच्याबाबत प्रत्येक ...

Taimur tweeted to go to Kareena's cottage, captivity in Balili's camera | आई करीनाच्या कुशीत जाण्यासाठी चिमुकल्या तैमूरचा हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

आई करीनाच्या कुशीत जाण्यासाठी चिमुकल्या तैमूरचा हट्ट, बाललीला कॅमे-यात कैद

googlenewsNext
लिवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा होणं काही नवं नाही. मग सुपरस्टार्सच्या मुला-मुलींची बॉलिवूडमध्ये एंट्री असो किंवा त्यांचं खासगी जीवन.त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.या सगळ्या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलिवूडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर.त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलिवूड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात.त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय.काही दिवसांपूर्वी बेगम करीना कपूर तैमूरसह आपली मैत्रीण अमृता अरोरा हिच्या घरी गेली होती. त्यावेळी कारमधून उतरुन बेबो अमृताच्या घराकडे जायला निघाली.त्यावेळी आपल्या आईचं असं जाणं तैमूरला खटकलं. मग तैमूर आपल्या आईकडे जाण्यासाठी हट्ट करु लागला.आईनं आपल्याला कुशीत घ्यावे यासाठी तो हट्ट करु लागला. त्याचा बालहट्ट असा काही होता की त्याचा सांभाळ करणा-या केअरटेकरलाही तैमूरला सांभाळणं कठीण झालं होतं. तैमूरच्या याच बाललीलांचे काही फोटो समोर आलेत. आपल्या आईच्या कुशीत जाण्यासाठी तैमूर कसा हट्ट करतोय ते या फोटोत पाहायला मिळतंय.या फोटोंमध्ये बेबो ग्रे रंगाच्या गाऊनमध्ये पाहायला मिळतेय.तैमूरच्या जन्माआधी २०१६मध्ये बेबो करीना उडता पंजाब या सिनेमात झळकली होती. त्यानंतर तिनं बॉलिवूड सिनेमांपासून ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये बेबोनं आपला सगळा वेळ लाडका लेक तैमूरसाठी दिला. तैमूरची देखभाल आणि त्याची काळजी घेण्याला सुपरमॉम बेबोनं प्राधान्य दिलं. लवकरच करीना रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शशांक घोष दिग्दर्शित वीरे दी वेडिंग सिनेमातून बेबो रुपेरी पडद्यावर कमबॅक करतेय. सध्या या सिनेमाची शुटिंग सुरु असून हा सिनेमा या वर्षी रसिकांच्या भेटीला येईल.








Web Title: Taimur tweeted to go to Kareena's cottage, captivity in Balili's camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.