अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:46 PM2019-02-14T17:46:28+5:302019-02-14T17:56:02+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी कलाकाराची शोध मोहीम सुरु होती ती अखेर संपली आहे

Tahir bhasin will play sunil gavaskar role in Kabir Khan's '83' movie | अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३'

अखेर ठरले, 'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका कबीर खानच्या '८३'

ठळक मुद्देकबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे '८३' हा  सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

कबीर खानचा '८३' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच तो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी कलाकाराची शोध मोहीम सुरु होती ती अखेर संपली आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. या सिनेमात रणवीर सिंगनंतर ताहिर भसीनचे कास्टिंग करणे सगळ्यात कठीण गेल्याचे कबीर खान सांगतो. 


कबीर खान म्हणाला, ''सुनील गावस्कर यांचे कास्टिंग आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होते कारण ते टीमचे सुपरस्टार होते. ताहिर या भूमिकेसाठी परफेक्ट आहे.'' 


कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर  माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. 


  '८३' हा  सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.  रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Tahir bhasin will play sunil gavaskar role in Kabir Khan's '83' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.