SHOCKING ! ​गातांना उभी न झाल्याने सहा महिन्यांच्या गर्भवती गायिकेला घातल्या गोळ्या, पाकिस्तानातील घटना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 06:48 AM2018-04-12T06:48:58+5:302018-04-12T12:20:54+5:30

पाकिस्तानातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  पाकच्या दक्षिण सिंध प्रांतात एका २४ वर्षीय गर्भवती गायिकेची भर मैफिलीत गोळ्या ...

SHOCKING! Pills thrown for six-month pregnant singers, incidents in Pakistan due to missing songs | SHOCKING ! ​गातांना उभी न झाल्याने सहा महिन्यांच्या गर्भवती गायिकेला घातल्या गोळ्या, पाकिस्तानातील घटना!!

SHOCKING ! ​गातांना उभी न झाल्याने सहा महिन्यांच्या गर्भवती गायिकेला घातल्या गोळ्या, पाकिस्तानातील घटना!!

googlenewsNext
किस्तानातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  पाकच्या दक्षिण सिंध प्रांतात एका २४ वर्षीय गर्भवती गायिकेची भर मैफिलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  गर्भवती असल्याने ती गाणे गाताना उभी होऊ शकली नाही, केवळ याच कारणामुळे आरोपीने सर्वांदेखत या गायिकेला ठार मारले.
समीना सामून असे या गायिकेचे नाव आहे. ती सहा महिन्यांची गर्भवती होती. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कंगा गावात तिचा गाण्याचा कार्यक्रम होता. समीना मंचावर बसून गाणे गात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारिक जटोई नामक आरोपी यादरम्यान वारंवार तिला उभे होऊन गाण्याची मागणी करत होता. गर्भवती असल्याने उभे राहून गाणे समीनासाठी त्रासदायक होते. त्यामुळे आधी तिने या मागणीकडे दुर्लक्ष केले. पण तारिक जटोई जुमानला नाही. ती उभी होत नाही म्हणून तो संतापला आणि त्याने तिला स्टेजवरच गोळ्या घातल्या. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीनाला तत्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच गायिकेचा मृत्यू झाला होता.
 




या घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. पाकिस्तानच्या कपिल देव नामक मानवाधिकार कार्यकर्त्याने हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. गायिकेची हत्या केल्यानंतर आरोपी तिच्या पतीवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप या मानवाधिकार कार्यकर्त्याने केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
गतवर्षी पाकिस्तानातचं कव्वाल व सुफी संगीत क्षेत्रातील दिग्गज अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली होती. २३ जून २०१६ रोजी कराचीत दोन मोटर सायकलस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तहरीक ए तालिबान पाकिस्तान या अतिरेकी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. 

Web Title: SHOCKING! Pills thrown for six-month pregnant singers, incidents in Pakistan due to missing songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.