इतक्या वर्षांत इतकी बदलली शिल्पा शेट्टी; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 07:56 AM2018-06-08T07:56:34+5:302018-06-08T13:27:58+5:30

बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेकजणी डेब्यू करतात. यापैकी अनेक अभिनेत्रींच्या वाट्याला ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे येते आणि यानंतर अचानक त्या ...

Shilpa Shetty changed so many years; Do not trust old photos! | इतक्या वर्षांत इतकी बदलली शिल्पा शेट्टी; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

इतक्या वर्षांत इतकी बदलली शिल्पा शेट्टी; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

googlenewsNext
लिवूडमध्ये दरवर्षी अनेकजणी डेब्यू करतात. यापैकी अनेक अभिनेत्रींच्या वाट्याला ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असे सगळे येते आणि यानंतर अचानक त्या बॉलिवूडमधून गायब होतात. अर्थात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताहेत. पण त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच. अशीच एक बॉलिवूडची अभिनेत्री आहे, ती म्हणजे, शिल्पा शेट्टी.  



शिल्पाचा जन्म ८ जून १९७५ रोजी मंगळूरू येथे झाला. मुंबईत तिचे शिक्षण झाले. शिक्षणासोबत खेळ आणि डान्स यात शिल्पाला रस होता. पुढे ती अभिनयाकडे वळली.  १९९३ मध्ये  बाजीगर  या चित्रपटातून शिल्पाने बॉलिवूड डेब्यू केला. आत्तापर्यंत हिंदीसह तामिळ, तेलगू, कन्नडमधील सुमारे ४५ चित्रपट शिल्पाच्या नावावर आहेत. हिंदी, इंग्लिश, गुजराती, तेलगू आणि तामिळ अशा सर्व भाषा शिल्पा अगदी सहजपणे बोलते. शिल्पा लहानपणी खूप वेगळी दिसायची. ते फोटो बघता ही मुलगी एक  दिवस बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री बनणार, याची कल्पनाही करवत नाही. पण शिल्पाने ते करून दाखवले़ इतक्या वर्षांत शिल्पा इतकी बदलली की, त्यावर विश्वास बसणार नाही.



इंडस्ट्रीत शिल्पाने एन्ट्री घेतली तेव्हा तिचे लूक फारचं वेगळे होते. आजची शिल्पा पाहून तिने यासाठी किती मेहनत घेतली असावी, याचा अंदाज येतो.



शिल्पा आता बॉलिवूडची सर्वाधिक फिट अभिनेत्री आहे. नियमित योग आणि संतुलित आहार या जोरावर तिने हे फिटनेस मिळवले आहे.



शिल्पाच्या करिअरमध्ये एक काळ असाही आला, जेव्हा सगळे मागे सुटून जाईल की काय, असे तिला वाटले. पण याचकाळात म्हणजे २००७ मध्ये ब्रिटनच्या ‘बिग ब्रदर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली. केवळ दिसली नाही तर तिने हा शो जिंकला. हा शो जिंकणारी ती पहिली भारतीय बनली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. २२ नोव्हेंबर २००९ मध्ये शिल्पाने ब्रिटीश- इंडियन बिझनेसमॅन राज कुंद्रासोबत लग्न केले. शिल्पा राजची दुसरी पत्नी आहे. या दोघांचा वियान नावाचा एक मुलगाही आहे.



शिल्पाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. पण आयटम साँग्स आणि ठुमके यासाठी ती जास्त ओळखली गेली. 
चित्रपटात येण्यापूर्वी शिल्पा मॉडेलिंग करायची़ १९९१ मध्ये एका जाहिरातीत झळकली आणि यांनतर तिच्या वाट्याला अनेक जाहिराती आल्यात़ याच जाहिरातींनी तिला ‘बाजीगर’ हा चित्रपट मिळवून दिला़
शिल्पा शेट्टी ग्लॅमरसाठी ओळखली  गेली तशीच तिच्या रिलेशनशिपच्याही चर्चा झाल्यात. अक्षय कुमारसोबतचे तिचे रिलेशनशिपची चांगलीच चर्चा झाली. ‘मैं खिलाडी तू अनाडी’च्या सेटवर या दोघांत प्रेम बहरल्याचे मानले जाते़ पण कालांतराने दोघांमध्येही ब्रेकअप झाले.   

Web Title: Shilpa Shetty changed so many years; Do not trust old photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.