सलमानच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरूख खानने घेतला एक मोठा निर्णय! जाणून घ्यायचे असेल तर वाचा बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 02:03 PM2018-06-17T14:03:20+5:302018-06-17T19:33:20+5:30

सलमान खान नवीन टॅलेंटला संधी देणारा ‘खान’ म्हणून ओळखला जातो. सलमानने अनेकांना लॉन्च केले. यातील अनेकांना बॉलिवूडमध्ये भक्कम पाय ...

Shah Rukh Khan took a big decision to step on Salman's footstep! Read the news if you want to know !! | सलमानच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरूख खानने घेतला एक मोठा निर्णय! जाणून घ्यायचे असेल तर वाचा बातमी!!

सलमानच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरूख खानने घेतला एक मोठा निर्णय! जाणून घ्यायचे असेल तर वाचा बातमी!!

googlenewsNext
मान खान नवीन टॅलेंटला संधी देणारा ‘खान’ म्हणून ओळखला जातो. सलमानने अनेकांना लॉन्च केले. यातील अनेकांना बॉलिवूडमध्ये भक्कम पाय रोवून उभे आहेत. डेजी शाह, एली अबराम अशा अनेकांची नावे यात घेता येतील. अनेकांच्या बुडत्या करिअरला सलमानने हात दिला. यात सगळ्यांत मोठे नाव म्हणजे, कॅटरिना कैफ. लवकरच सलमान आणखी न्यूकमर्सला लॉन्च करणार आहे. यात त्याचा मेहुणा आयुष शर्मा, वरिना हुसैन या दोघांचे नाव आहे. दोघेही ‘लवरात्रि’ या चित्रपटातून डेब्यू करताहेत. यानंतर जहीर इक्बाल यालाही सलमान लॉन्च करतोय. याशिवाय महेश मांजरेकरची मुलगी अश्वामी मांजरेकर हिलाही सलमान संधी देतोय. ती लवकरचं सलमानच्या ‘दबंग3’मध्ये दिसणार आहे.  आता हे सगळे इतके तपशीलवार सांगायचे कारण म्हणजे, लवकरच बॉलिवूडचा एक आणखी ‘खान’ सलमानच्या पावलावर पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे.
होय, हा खान म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून शाहरूख खान आहे. सलमानप्रमाणेच शाहरूखही आता नव्या टॅलेंटला संधी देणार आहे. ताजी बातमी मानाल तर आपल्या ‘रेड चिली एंटरटेनमेंट’ या बॅनरखाली शाहरूख खान नव्या टॅलेंटला लॉन्च करणार आहे. आपली ही कल्पना त्याने सलमानसोबत शेअर केल्याचेही कळतेय. साहजिकच बॉलिवूडमध्ये येऊ इच्छिणा-यांसाठी ही संधी कुठल्या सुवर्णसंधीशिवाय कमी नसेल. आता केवळ ही संधी कुण्याच्या वाट्याला येते, त्याचीच प्रतीक्षा असेल.

ALSO READ : ‘झिरो’चा टीजर रिलीज! शाहरूख खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’!

लवकरच शाहरूखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यात सलमानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे, अलीकडे या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. त्यात सलमान व शाहरूख एकत्र थिरकताना दिसले होते.

Web Title: Shah Rukh Khan took a big decision to step on Salman's footstep! Read the news if you want to know !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.