सलमानचे आहे का अजूनही कतरिनावर प्रेम? 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान पहायला मिळाली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 08:14 PM2019-05-29T20:14:45+5:302019-05-29T20:18:12+5:30

सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ झळकणार आहे.

Is Salman still love Katariya? A glimpse to the 'India' promotion | सलमानचे आहे का अजूनही कतरिनावर प्रेम? 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान पहायला मिळाली झलक

सलमानचे आहे का अजूनही कतरिनावर प्रेम? 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान पहायला मिळाली झलक

googlenewsNext

सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ झळकणार आहे. विशेष बाब आहे की त्या दोघांनी एकमेकांना डेट केलेले आहे. मात्र त्यांचे रिलेशनशीप जास्त काळ टिकू शकले नाही. २०१० साली ते दोघे विभक्त झाले. मात्र त्या दोघांमधील मैत्री कधी संपली नाही. ते एकमेकांची काळजी घेताना पहायला मिळाले आहेत. विशेष करून सलमान. सध्या ते दोघे भारतच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. कित्येक वेळा सलमान कतरिनाला घेऊन असे वक्तव्य करतो की ज्या वरून वाटते की आजही तो कतरिनाला लाइक करतो आहे.
 
नुकतेच भारत चित्रपटातील जिंदा गाण्याच्या लाँचवेळी एका रिपोर्टरने कतरिना कैफला तिच्या भूमिकेबद्दल विचारले आणि सलमानला भाई जान असे संबोधले. त्यावर सलमान म्हणाला की, तुमचा भाई जान हिचा (कतरिना) नाही. यानंतर दुसऱ्या पत्रकाराने विचारले की, जर कतरिना सलमान खानला भाईजान संबोधणार नाही तर ती कोणता जान म्हणेल? यावर सलमानने उत्तर दिले की मेरी जान.


तसेच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सलमानला कतरिनाला दुसरा करियर ऑप्शन द्यायला सांगितले. त्यावर सलमानने कतरिनाची मस्करी करत म्हटले की, कतरिनाने लग्न केले पाहिजे आणि मुले प्रोड्युस केले पाहिजे. मस्करीतच का होईना सलमानने कतरिनाला असा सल्ला का दिला? काही दिवसांपूर्वी सलमानने वडील बनण्याची इच्छा जाहीर केली होती. सलमान म्हणाला होता की, जर तो लग्न करेल तर फक्त मुले पाहिजेत म्हणून.


चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कतरिना घेऊन असे काही वक्तव्य केले ज्यावरून सलमानसाठी कतरिना किती महत्त्वाची आहे, हे समजते.

तिच्यासोबत काम केल्यामुळेदेखील सलमान खूप खूश आहे. भारत चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Is Salman still love Katariya? A glimpse to the 'India' promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.