सलमान खान नेहमी काळ्या रंगाचे कपडेच का परिधान करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:28 PM2019-04-16T15:28:37+5:302019-04-16T15:29:34+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान बहुतांश काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

salman khans designer ashley rebello tells why actor is seen mostly wearing black clothes | सलमान खान नेहमी काळ्या रंगाचे कपडेच का परिधान करतो?

सलमान खान नेहमी काळ्या रंगाचे कपडेच का परिधान करतो?

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या सलमान ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान बहुतांश काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. होय, त्याच्या   काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यामागे एक खास कारण आहे. सलमानच्या डिझाईनरने नुकताच याबाबतचा खुलासा केला.  
तुुम्हाला ठाऊक असेलच की, डिझायनर अ‍ॅश्ले रेबेलो हा सलमानचा ड्रेस डिझायनर आहे. अलीकडे त्याने  सोशल मीडियावर चाहत्यांना प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने अश्ले रेबेलोला एक खास विनंती केली. सोबत काळाच रंग का? असा प्रश्नही केला. ‘प्लीज, सलमानची ड्रेसिंग स्टाईल बदल. तो नेहमी काळ्या रंगाचे कपडेच का परिधान करतो?’ असे या चाहत्याने विचारले.  त्यावर ‘कारण सलमानला दुसरा कुठलाच रंग आवडत नाही,’ असे मजेशीर उत्तर अ‍ॅश्लेने दिले.


 

सध्या सलमान ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. यात सलमान पुन्हा एकदा चुलबुल पांडे हे आयकॉनिक पात्र साकारताना दिसणार आहे.  ‘दबंग 3’ हा चित्रपट ‘दबंग’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान व सोनाक्षी सिन्हाची जोडी पहायला मिळणार आहे. त्याचा ‘भारत’ हा सिनेमाही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.  या चित्रपटात भाईजान सलमान खानसोबत कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ‘दबंग ३’ हातावेगळा केल्यानंतर सलमान संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. भन्साळींच्या या चित्रपटात प्रथमच सलमान व आलिया भटची जोडी पहायला मिळणार आहे.

Web Title: salman khans designer ashley rebello tells why actor is seen mostly wearing black clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.