भाईजानचा ‘दबंग 3’ वादात, पुरातत्व विभागाने बजावले नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:08 AM2019-04-10T10:08:18+5:302019-04-10T10:08:48+5:30

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’चे शूटींग संकटात सापडले आहे. होय, मध्यप्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण याचदरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने सलमान खानला नोटीस बजावले आहे.

salman khan dabangg 3 shoot in trouble asi issued notice | भाईजानचा ‘दबंग 3’ वादात, पुरातत्व विभागाने बजावले नोटीस

भाईजानचा ‘दबंग 3’ वादात, पुरातत्व विभागाने बजावले नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी  दबंग 3’च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता.  या फोटोत एक शिवलिंग लाकडाच्या चौकटीने झाकलेले दिसत होते. हा फोटो व्हायरल होताच लोकांनी सेटवर गोंधळ घातला होता.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’चे शूटींग संकटात सापडले आहे. होय, मध्यप्रदेशात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण याचदरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने सलमान खानला नोटीस बजावले आहे. मध्यप्रदेशच्या मांडूस्थित ऐतिहासिक जल महालात उभारलेले दोन सेट तात्काळ हटविण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले आहेत. निर्मात्यांनी या आदेशाचे पालन न केल्यास शूटींग रद्द केले जाईल, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.


प्राप्त माहितीनुसार, संबंधित प्रॉडक्शन हाऊसला याबाबत आधीच सूचना देण्यात आली होती. पण त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले.  ‘दबंग 3’च्या निर्मात्यांनी हवा महलात सेट उभारून प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ व अवशेष कायदा १९५९च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे.  ‘दबंग 3’च्या टीमने नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींना नुकसान पोहोचवल्याचा आरोपही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या दाव्यानुसार, किल्ल्यातील सेट हटविताना येथील प्राची मूर्तींचे अशत: नुकसान झाले.दरम्यान मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधो यांनी हा सगळा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मी स्वत: याठिकाणी जाऊन पाहणी करेल. त्या लोकांनी शूटींगदरम्यान काही चुकीचे केले असेल तर निश्चितपणे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


काही दिवसांपूर्वी  दबंग 3’च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता.  या फोटोत एक शिवलिंग लाकडाच्या चौकटीने झाकलेले दिसत होते. हा फोटो व्हायरल होताच लोकांनी सेटवर गोंधळ घातला होता. केवळ इतकेच नाही तर सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपानेही या वादात उडी घेतली होती.
 ‘दबंग 3’ हा चित्रपट ‘दबंग’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान व सोनाक्षी सिन्हाची जोडी पहायला मिळणार आहे.

Web Title: salman khan dabangg 3 shoot in trouble asi issued notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.