आणखीन एक सुपरहिट चित्रपट बनवण्याच्या तयारीत रोहित शेट्टी, सलमान खानची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 07:45 PM2019-01-28T19:45:41+5:302019-01-28T19:47:36+5:30

रोहित शेट्टी आपल्या आणखी एका चित्रपटाच्या तयारीला लागला असून यात सलमान खानची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

salman-khan-and-rohit-shetty-unite-for-a-cop-drama-after-success-of-simmba | आणखीन एक सुपरहिट चित्रपट बनवण्याच्या तयारीत रोहित शेट्टी, सलमान खानची वर्णी

आणखीन एक सुपरहिट चित्रपट बनवण्याच्या तयारीत रोहित शेट्टी, सलमान खानची वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देरोहित शेट्टी आपल्या आणखी एका चित्रपटाच्या तयारीला लागला आहेरोहित शेट्टीसोबत करणार सलमान खान काम


काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग व सारा अली खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास अडीचशे कोटींचा बिझनेस केला. त्यामुळे २०१८ हे वर्ष रोहित शेट्टीसाठी अधिक खास ठरले. आता यानंतर रोहित शेट्टी आपल्या आणखी एका चित्रपटाच्या तयारीला लागला असून यात सलमान खानची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी आगामी चित्रपटासाठी निर्माता साजिद नाडियाडवालासोबत काम करणार असल्याचे म्हटलं जात आहे. हा चित्रपट २०१४ साली आलेल्या साजिद यांच्या 'किक' चित्रपटाचा रिमेक असणार आहे. साजिद यांना या चित्रपटात सलमानला रोल देण्याची इच्छा असल्याने हा चित्रपट सलमानला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सलमान या चित्रपटात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रोहितने आपल्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाचीदेखील काही दिवसांपूर्वीच अधिकृत घोषणा केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून यानिमित्ताने पहिल्यांदाच अक्षय आणि रोहितची जोडी सोबत काम करताना दिसणार आहे. 

Web Title: salman-khan-and-rohit-shetty-unite-for-a-cop-drama-after-success-of-simmba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.