ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी ही आहे वाईट बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 02:46 PM2019-03-08T14:46:32+5:302019-03-08T14:53:00+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही.

Rishi Kapoor not returning to India anytime soon; Neetu Kapoor shares Saab's josh is great | ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी ही आहे वाईट बातमी

ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी ही आहे वाईट बातमी

googlenewsNext
ठळक मुद्देऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांवर ते चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या ट्रीटमेंटला अजून काही वेळ लागणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून ऋषी कपूर या महिन्याच्या अखेरीस भारतात परतणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर लवकरच मुंबईत परतणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. पण ते या महिन्यात तरी मुंबईत परतणार नसल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत.

ऋषी कपूर यांच्या एका मित्राने ते मार्चमध्ये भारतात परतणार असल्याचे मीडियाला सांगितले होते. पण अमेरिकेत ऋषी यांच्याशी वृत्तवाहिन्यांनी संपर्क केल्यानंतर त्यांचा सध्या तरी परत येण्याचा काहीही बेत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऋषी कपूर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांवर ते चांगला प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या ट्रीटमेंटला अजून काही वेळ लागणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून ऋषी कपूर या महिन्याच्या अखेरीस भारतात परतणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. ऋषी कपूर भारतात परतणार हे कळल्यावर त्यांचे चाहते चांगलेच खूश झाले होते. पण या बातमीमुळे त्यांची निराशा होणार यात काही शंकाच नाही. त्यांचे चाहते त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होवो अशी प्रार्थना करत आहेत. 

ऋषी मुंबईत परतणार या बातमीसोबतच रणबीर आणि आलियाच्या चर्चांना देखील काही दिवसांपासून ऊत आला होता. मुंबईत आल्यानंतर ऋषी कपूर सर्वप्रथम आलियाच्या कुटुंबाला भेटून लग्नाची बोलणी करतील. यानंतर शुभमुहूर्तासाठी भटजींना भेटण्याचीही त्यांची योजना आहे असे म्हटले जात होते. 

ऋषी कपूर यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी मुल्क या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट प्रेक्षकांना ऑगस्ट २०१८ मध्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title: Rishi Kapoor not returning to India anytime soon; Neetu Kapoor shares Saab's josh is great

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.