बॉक्स ऑफिसचे यावर्षीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार 'गली बॉय', हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:11 AM2019-02-14T10:11:17+5:302019-02-14T10:11:55+5:30

अभिनेता रणवीर सिंगचा 'गली बॉय' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ranveer singh gully boy to break record know advance booking first day box office collection | बॉक्स ऑफिसचे यावर्षीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार 'गली बॉय', हे आहे कारण

बॉक्स ऑफिसचे यावर्षीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार 'गली बॉय', हे आहे कारण

googlenewsNext

रणवीर सिंगचा आगामी बहुचर्चित चित्रपट गली बॉय व्हॅलेंटाइन डेला प्रदर्शित झाला असून सिनेप्रेमासाठी पर्वणी ठरणार आहे. रॅपर सिंगरवर आधारीत असलेल्या गली बॉयचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भटदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास ८ कोटींची कमाई केली असल्याचे समजते आहे.


गली बॉयने प्रदर्शनापूर्वीच अ‍ॅडव्हान बुकिंगमार्फत खूप चांगले कलेक्शन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास ८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यात मुंबई, पुणे व बंगळुरूमध्ये जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. कोलकाता व दिल्लीमध्ये देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढतो आहे. आजपर्यंत चित्रपटाच्या बुकिंगमध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे बजेट ५० कोटी असल्याचे बोलले जात आहे.


ट्रेड रिपोर्टच्यानुसार, गली बॉय पहिल्या दिवशी १५ कोटींची कमाई करू शकतो. या सिनेमाचे वितरकांच्या अंदाजानुसार रणवीर सिंगचा चित्रपट व्हॅलेंटाइन डेमुळे पहिल्याच दिवशी १८ ते २० कोटींची कमाई करू शकतो. 


‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे. या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

Web Title: ranveer singh gully boy to break record know advance booking first day box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.