लग्नगाठ बांधण्यापूर्वी ‘या’ सुपरहिट शोमध्ये दिसणार ‘दीप-वीर’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 02:41 PM2018-08-20T14:41:25+5:302018-08-20T14:43:30+5:30

 रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. तत्पूर्वी रणवीर व दीपिका दोघांच्याही चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे.

ranveer singh and deepika padukone will face karan johar on koffee with karan6 before getting married | लग्नगाठ बांधण्यापूर्वी ‘या’ सुपरहिट शोमध्ये दिसणार ‘दीप-वीर’!!

लग्नगाठ बांधण्यापूर्वी ‘या’ सुपरहिट शोमध्ये दिसणार ‘दीप-वीर’!!

googlenewsNext

 रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. तत्पूर्वी रणवीर व दीपिका दोघांच्याही चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. होय, दीपिका व रणवीर लवकरच करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या सुपरहिट शोमध्ये गेस्ट म्हणून दिसणार आहेत. करणने अलीकडे ‘कॉफी विद करण’च्या नव्या सीझनची घोषणा केली आहे. ताज्या माहितीनुसार, रणवीर व दीपिका या शोचे पहिले गेस्ट असणार आहेत. खरे तर ‘कॉफी विद करण’मध्ये हे दोन्ही कलाकार यापूर्वीही अनेकदा दिसलेत. पण रणवीर व दीपिका एकत्र असे पहिल्यांदाचं या शोमध्ये करणच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसतील. ‘कॉफी विद करण’च्या याआधीच्या सीझनमध्ये ही जोडी एकत्र दिसेल, अशा बातम्या होत्या. पण दीपिका कामात बिझी असल्यामुळे हा योग चुकला होता. पण दीपिका व रणवीरच्या लग्नापूर्वी हा योग जुळून आला आहे.
चर्चा खरी मानाल तर ‘कॉफी विद करण’च्या या सीझनमध्ये केवळ रणवीर व दीपिकाचं नाही तर प्रियांका चोप्रा- निक जोनास तसेच अनुष्का शर्मा व विराट कोहलीही दिसू शकतात. कदाचित करण यावेळी प्रेक्षकांना काही खास देण्याच्या तयारीत आहे.

येत्या २० नोव्हेंबरला इटलीतील लोम्बा येथे असणाऱ्या लेक कोमो या नयनरम्स ठिकणी ‘दीप-वीर’चा  शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तूर्तास दीपिका व रणवीर दोघेही लग्नाबद्दल पूरेपूर गोपनियता बाळगून आहेत. हा लग्नसोहळा अतिशय खासगी व्हावा,असा त्यांचा प्रयत्न आहेत आणि यामुळे हे लग्न भारतात न होता इटलीत होणार आहे. 

 

Web Title: ranveer singh and deepika padukone will face karan johar on koffee with karan6 before getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.