रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली ब्वॉय’चा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 11:24 AM2019-01-02T11:24:03+5:302019-01-02T11:26:05+5:30

रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. ‘सिम्बा’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली असतानाचं आता नववर्षांत रणवीरचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘गली ब्वॉय’.

ranveer singh alia bhatt starrer gully boy new posters out | रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली ब्वॉय’चा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात?

रणवीर सिंग, आलिया भट्टच्या ‘गली ब्वॉय’चा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘गली ब्वॉय’ हा चित्रपट मुंबईतल्या रस्त्यांवर राहणा-्या मुलांची कथा आहे. यात त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. ‘सिम्बा’ने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवली असतानाचं आता नववर्षांत रणवीरचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘गली ब्वॉय’. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात प्रथमच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी एकत्र दिसणार आहे. होय,  ‘गली ब्वॉय’त रणवीर सिंग आणि आलिया भट्ट   मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आलिया आणि रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 



 ‘अपना टाईम आएगा’ अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे.  चित्रपटाच्या पोस्टरसोबतच प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली गेली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी सेटवरचे काही रणवीर आणि आलियाचे शूटिंग दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  या चित्रपटासाठी रणवीर आपला लूकपणे बदलला आहे. ‘पद्मावत’नंतर लगेच रणवीरने या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले होते. या चित्रपटासाठी तो पुन्हा एकदा आपल्या  मुळ रुपात परतला होता. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत. ‘गली ब्वॉय’नंतर ‘सिम्बा’साठी रणवीरने पुन्हा वजन वाढवले होते. 




‘गली ब्वॉय’ हा चित्रपट मुंबईतल्या रस्त्यांवर राहणा-्या मुलांची कथा आहे. यात त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. आलिया या चित्रपटात पुन्हा एकदा मुस्लिम तरूणीच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी ‘राजी’ या चित्रपटात आलिया मुस्लिम तरूणीची भूमिका साकारताना दिसली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

Web Title: ranveer singh alia bhatt starrer gully boy new posters out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.