आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 11:47 AM2019-03-28T11:47:01+5:302019-03-28T11:52:03+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट बी-टाऊनमधलं सगळ्यात हॉट कपल आहे. नुकतेच दोघांचे फिल्मफेअरमध्ये अॅवॉर्ड दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

Ranbir kapoor cant take his eyes off alia bhatt in a new brahmastra film | आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल!

आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल!

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या दोघे 'ब्रह्यास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहेतयासिनेमाच्या सेटवरचा फोटो अयान मुखर्जीने शेअर केला आहे

रणबीर कपूर आणि आलिया भट बी-टाऊनमधलं सगळ्यात हॉट कपल आहे. नुकतेच दोघांचे फिल्मफेअरमध्ये अॅवॉर्ड दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्यावेळी तिने स्टेजवर दिलेल्या भाषणात चक्क रणबीर कपूरवरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आणि सगळेच अवाक् झालेत.

सध्या दोघे 'ब्रह्यास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. या सिनेमाच्या सेटवर दोघांचा रोमान्स सुरु झाला होता.  यासिनेमाच्या सेटवरचा फोटो अयान मुखर्जीने शेअर केला आहे. ज्यात रणबीरची नजर आलियावरुन हटत नाहीय.    


आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे. . (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या.  )‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.

 करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक चित्रपट केलेत. या चित्रपटाने त्याची  लव्हरबॉय  ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे. कदाचित म्हणूनचं रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ सारखा चित्रपट साईन केला आहे. 'ब्रह्मास्त्र' ख्रिसमसच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Ranbir kapoor cant take his eyes off alia bhatt in a new brahmastra film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.