शाहरुख खान ‘प्रोड्यूसर’ तर अमिताभ बच्चन ‘कर्मचारी’! या अंदाजात घेतला सेल्फी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 02:17 PM2019-02-24T14:17:22+5:302019-02-24T14:17:57+5:30

महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे.

producer shah rukh khan and employed amitabh bachchans selfie | शाहरुख खान ‘प्रोड्यूसर’ तर अमिताभ बच्चन ‘कर्मचारी’! या अंदाजात घेतला सेल्फी!!

शाहरुख खान ‘प्रोड्यूसर’ तर अमिताभ बच्चन ‘कर्मचारी’! या अंदाजात घेतला सेल्फी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बदला’ या चित्रपटात अमिताभ बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत.

महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ आणि शाहरुख सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटोला अमिताभ यांनी दिलेले कॅप्शन चांगलेच खास आहे. होय, ‘निर्माता आणि कर्मचारी....सेल्फी घेताना...तो निर्माता आहे आणि मी कर्मचारी....,’असे अमिताभ यांनी लिहिले आहे.




आता अमिताभ यांनी स्वत:ला कर्मचारी का म्हणावे, तर आम्ही सांगतोय. कारण अमिताभ लवकरच शाहरुखच्या रेड चिली प्रॉडक्शनअंतर्गत येऊ घातलेल्या ‘बदला’ या चित्रपटात दिसणार आहेत. म्हणजेच, ‘बदला’ हा चित्रपट शाहरुखने प्रोड्यूस केलेला आहे. हा चित्रपट सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय तापसी पन्नू लीड रोलमध्ये आहे. सोबतच शाहरूख खान हाही अतिथी भूमिकेत दिसणार आहे.


यापूर्वी शाहरूख व अमिताभ यांनी वीरझारा, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, भूतनाथ अशा अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ही जोडी जेव्हा केव्हा एकत्र आली,तेव्हा तेव्हा त्यांच्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. ‘बदला’ या चित्रपटात अमिताभ बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत. बादल गुप्ता ४० वर्षांत एकही केस हरलेला नाही. पण एक केस त्याला आव्हान देते. ही केस तापसी पन्नू लढताना दिसतेय. एकंदर काय तर या चित्रपटाच्या निमित्ताने एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तापसी व अमिताभ यांच्या ‘पिंक’मधील कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांनी पाहिलाय.

Web Title: producer shah rukh khan and employed amitabh bachchans selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.