हेरा फेरी 3 च्या बाबतीत उलगडल्या या नव्या गोष्टी, हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 01:48 PM2019-04-19T13:48:18+5:302019-04-19T13:50:12+5:30

हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी तर फिर हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी केले होते. हेरा फेरी 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार असल्याची चर्चा होती.

Priyadarshan to direct Hera Pheri 3. Time-leap for Akshay Kumar, Suniel Shetty and Paresh Rawal | हेरा फेरी 3 च्या बाबतीत उलगडल्या या नव्या गोष्टी, हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

हेरा फेरी 3 च्या बाबतीत उलगडल्या या नव्या गोष्टी, हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियदर्शन यांनी सांगितले आहे की, मी सध्या मराक्करः द लायन ऑफ अरेबियन सी या माझ्या मल्याळम चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे काम झाल्यानंतरच मी हेरा फेरीवर काम करायला सुरुवात करणार आहे. सध्या तरी या चित्रपटाबाबत मी काहीही ठरवेलेले नाहीये.

हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या तिकडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर याच तिकडीला घेऊन निर्मात्यांनी फिर हेरा फेरी हा हेरी फेरीचा दुसरा भाग बनवला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

फिर हेरी फेरी या चित्रपटाच्या यशानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची केवळ वन लाईन ऐकून त्या तिघांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई मिररने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, फिर हेरा फेरी हा चित्रपट जिथे संपला, त्याच्या पुढेच हेरा फेरी 3 ची कथा सुरू होणार आहे. हेरा फेरी 3 मध्ये काही वर्षांचा लीप दाखवला जाणार असून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल त्यांच्या खऱ्या आयुष्यातील वयाचीच व्यक्तिरेखा या चित्रपटात साकारणार आहेत. 

हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी तर फिर हेरा फेरी या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी केले होते. हेरा फेरी 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार असल्याची चर्चा होती. इंद्र कुमार या चित्रपटाच्या कथेवर काम देखील करत असल्याचे म्हटले जात होते. पण आता इंद्र कुमार या चित्रपटाचा भाग नसून प्रियदर्शन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रियदर्शन यांनी देखील या गोष्टीला दुजोरा देत सध्या या चित्रपटाबाबत अक्षय, सुनील आणि फिरोज यांच्यासोबत बोलणे सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले आहे की, मी सध्या मराक्करः द लायन ऑफ अरेबियन सी या माझ्या मल्याळम चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हा चित्रपट अतिशय भव्य असून या चित्रपटाचे काम झाल्यानंतरच मी हेरा फेरीवर काम करायला सुरुवात करणार आहे. सध्या तरी या चित्रपटाबाबत मी काहीही ठरवेलेले नाहीये. 

नीरज व्होरा यांचे निधन 2017 मध्ये झाले. त्याआधी नीरज हेरा फेरी 3 च्या पटकथेवर काम करत होते. त्यांनी लिहिलेल्या पटकथेचा धागा पकडूनच हेरा फेरी 3 ची पटकथा लिहिण्यात येणार असल्याचे कळतेय.

Web Title: Priyadarshan to direct Hera Pheri 3. Time-leap for Akshay Kumar, Suniel Shetty and Paresh Rawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.