OMG! नाकात नथ, कानात डुल अन् माथ्यावर बिंदी!! रणबीर कपूरला झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 09:02 AM2017-11-06T09:02:04+5:302017-11-06T14:32:04+5:30

नाकात नथ, कानात डुल अन् माथ्यावर बिंदी अशा अवतारात रणबीर कपूर पाहायला मिळाला तर? आश्चर्य वाटले ना. पण आज आम्ही तुम्हाला रणबीर कपूरचा हाच लूक दाखवणार आहोत.

OMG! Nakat Natha, Kain Dulla and Mathias Bindi !! What happened to Ranbir Kapoor? | OMG! नाकात नथ, कानात डुल अन् माथ्यावर बिंदी!! रणबीर कपूरला झाले तरी काय?

OMG! नाकात नथ, कानात डुल अन् माथ्यावर बिंदी!! रणबीर कपूरला झाले तरी काय?

googlenewsNext
कात नथ, कानात डुल अन् माथ्यावर बिंदी अशा अवतारात रणबीर कपूर पाहायला मिळाला तर? आश्चर्य वाटले ना. पण आज आम्ही तुम्हाला रणबीर कपूरचा हाच लूक दाखवणार आहोत. होय, नाकात नथ, कानात डुल आणि माथ्यावर बिंदी असा कधी न पाहिलेला रणबीर या व्हिडिओत तुम्हाला दिसणार आहे.



होय, रणबीरने स्वत:च्या सोशल अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात रणबीरने सगळा साज-शृंगार केला आहे. अर्थात हा साज-शृंगार खरा नाही तर स्रॅपचॅट अ‍ॅपद्वारे केलेला आहे. यात रणबीर त्याच्या चिरपरिचित मस्तीभºया अंदाजात दिसतोय. रणबीरचा हा ‘दुल्हन’ अवतारातील व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. रणबीरचा हा मस्तीभरा व्हिडिओ तुम्हीही बघा आणि कसा वाटला, हे आम्हाला नक्की कळवा.
अलीकडे रणबीरने संजय दत्तच्या बायोपिकचे शूटींग संपवले. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. पण कदाचित चित्रपट रिलीज व्हायला बराच अवकाश आहे. तिकडे रणबीरने  आपल्या दुसºया चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. होय, संजय दत्तच्या बायोपिकचे शूटींग संपवल्यानंतर रणबीर  ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत गुंतला आहे.

ALSO READ: रणबीर कपूर नाही तर रणवीर सिंग उतरला मैदानात! माहिरा खानचा असा केला बचाव!!

धर्मा प्रॉडक्शनच्या या चित्रपटात रणबीर कपूरसह अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि मौनी राय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणबीर सध्या न्यूयॉर्कच्या ‘द फॉक्सग्रोव्ह‘ म्युझिक व डीजे स्कूलमध्ये अधिकाधिक वेळ घालवतोय. या कंपनीचे संस्थापक डेव्हिड मॉरिसकडून रणबीर ट्रेनिंग घेतोय.  ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट करण जोहर तीन भागांमध्ये रिलीज करणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चा पहिला भाग १५ आॅगस्ट २०१९ ला रिलीज केला जाईल.या चित्रपटासाठी रणबीर सध्या घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकही शिकतो आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘ड्रॅगन’ असे होते. अयान मुखर्जी ब-याच दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते . अद्भूत शक्ती असलेल्या एका सुपरहिरोची कथा यात आपल्याला बघायला मिळणार आहे. 

Web Title: OMG! Nakat Natha, Kain Dulla and Mathias Bindi !! What happened to Ranbir Kapoor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.