OMG!! आयुष्यमान खुराणाच्या ‘बधाई हो’ची कथा चोरीची??

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 10:31 AM2018-10-28T10:31:26+5:302018-10-28T10:34:18+5:30

होय, ‘बधाई हो’ची कथा चोरीची असल्याचा आरोप या चित्रपटावर होत आहे. 

OMG !! badhaai ho controversy faces allegation of stealing story | OMG!! आयुष्यमान खुराणाच्या ‘बधाई हो’ची कथा चोरीची??

OMG!! आयुष्यमान खुराणाच्या ‘बधाई हो’ची कथा चोरीची??

googlenewsNext

अभिनेता आयुष्यमान खुराणा याचा अलीकडे रिलीज झालेला ‘बधाई हो’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील आयुष्यमान व अन्य कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला. शिवाय चित्रपटाची अनोखी कथाही लोकांना आवडली. त्यामुळेच रिलीजच्या पहिल्याच दिवशी ७ कोटी ३५ लाखांची कमाई करत, बॉक्सआॅफिसवर जोरदार धडक दिली. आता या चित्रपटाची १०० कोटींकडे वाटचाल सुरू आहे. पण आता या चित्रपटाबद्दल धक्कादायक बातमी आहे. होय, ‘बधाई हो’ची कथा चोरीची असल्याचा आरोप या चित्रपटावर होत आहे. छत्तीसगडचे लेखक व पत्रकार परितोष चक्रवर्ती यांनी ‘बधाई हो’चे निर्माता, दिग्दर्शक व लेखकावर कथा चोरल्याचा आरोप करत रायपूरच्या पंडारी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

 19 वर्षांपूर्वी आलेल्या ‘घर बुनते हुए’ या आपल्या पुस्तकातील ‘जड’ नामक कथा चोरून हा चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोप परितोष यांनी केला आहे. सन 1998 मध्ये ‘जड’ नामक कथेचा आनंद बाजार पत्रिका ग्रुपशी संबंधित सुनंदा आणि कादम्बिनी या हिंदी साप्ताहिकाने बांगला भाषेत अनुवाद केला होता. ‘बधाई हो’ची कथा माझ्या याच कथेची हुबेहुब नक्कल करून बनवली आहे, असा दावाही परितोष यांनी केला आहे.
या चित्रपटात आयुष्यमान खुराणाशिवाय नीना गुप्ता,सान्या मल्होत्रा आदी प्रमुख भूमिकेत आहेत़ अमित शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Web Title: OMG !! badhaai ho controversy faces allegation of stealing story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.