भाईजानच्या ‘दबंग 3’मध्ये कन्नडचा ‘हा’ सुपरस्टार बनणार खलनायक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 01:47 PM2019-01-18T13:47:20+5:302019-01-18T13:48:36+5:30

‘भारत’ नंतर भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची.

kichcha sudeep to play a bad guy in salman khans dabangg 3 | भाईजानच्या ‘दबंग 3’मध्ये कन्नडचा ‘हा’ सुपरस्टार बनणार खलनायक!!

भाईजानच्या ‘दबंग 3’मध्ये कन्नडचा ‘हा’ सुपरस्टार बनणार खलनायक!!

googlenewsNext
ठळक मुद्देसुदीप कन्नडच्या अनेक चित्रपटात दिसला आहे. ‘मक्खी(इगा)’ आणि ‘फूंक’ सारख्या चित्रपटातील त्याच्या अदाकारीचे प्रचंड कौतुक झाले होते.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या ‘भारत’मध्ये बिझी आहे. या चित्रपटानंतर भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. येत्या एप्रिलपासून हे शूटींग सुरु होईल. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण चाहत्यांना खरी प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटात विलेन कोण असणार हे जाणून घेण्याची. आता तेही स्पष्ट झाले आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर कन्नड स्टार किच्चा सुदीप हा ‘दबंग 3’चा विलेन असणार आहे.


मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुदीप व सलमान दीर्घ काळापासून एकत्र काम करू इच्छितात. अखेर ‘दबंग 3’च्या निमित्ताने हा योग जुळून आला, असेचं म्हणायला हवे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात सुदीप व सलमान ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’सारखा लपंडाव खेळताना दिसतील. अलीकडे सुदीपच्या ‘पहलवान’ या चित्रपटाचा टीजर सलमानने आपल्या सोशल अकाऊंटवर लॉन्च केला होता.


सुदीप कन्नडच्या अनेक चित्रपटात दिसला आहे. ‘मक्खी(इगा)’ आणि ‘फूंक’ सारख्या चित्रपटातील त्याच्या अदाकारीचे प्रचंड कौतुक झाले होते.
२०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. गतवर्षी ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती. सध्या सलमान ‘भारत’ सिनेमाचे शूटींग करतोये. सलमान आणि कॅटरिना कैफ‘भारत’ मध्ये एकत्र दिसणार आहे. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफला या सिनेमात कास्ट करण्यात आले. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

Web Title: kichcha sudeep to play a bad guy in salman khans dabangg 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.