जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:26 PM2018-09-06T21:26:35+5:302018-09-06T21:27:44+5:30

करण जोहरच्याच धर्मा प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमाही जान्हवीच्या झोळीत पडल्याची खबर आहे. 

janhvi kapoor signed dharma productions film which is based on the life of gujan saxena the first woman iaf chopper pilot | जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!!

जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!!

googlenewsNext

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरने करण जोहर निर्मित ‘धडक’मधून शानदार डेब्यू झाला. यानंतर जान्हवी कुठला चित्रपट साईन करणार, ही उत्सुकता असतानांच करण जोहरच्याच‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटात तिची वर्णी लागली. खुद्द करणने या चित्रपटाची घोषणा केली. आता करण जोहरच्याच धर्मा प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमाही जान्हवीच्या झोळीत पडल्याची खबर आहे. होय, ताजी बातमी मानाल तर करणच्या या चित्रपटात जान्हवी इंडियन एअर फोर्सची पहिली महिला चॉपर पायलट गुंजन सक्सेनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कारगिल युद्धादरम्यान गुंजनने आपल्या जीवाची बाजी लावत अनेक जवानांचा जीव वाचवला होता. शत्रूने गुंजनच्या विमानाला चहूबाजूंनी घेरल्यानंतरही तिने अनेक भारतीय सैनिकांना जीवदान दिले. 

सध्या गुंजन व जान्हवीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून जान्हवीने गुंजनचे बायोपिक साईन केल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘कारगिल गर्ल’ गुंजन सक्सेनाच्या आयुष्यावर चित्रपट बनणार, अशी बातमी गतवर्षीच चर्चेत होती. आता या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. जान्हवीने हा चित्रपट साईन केला असेल तर तिच्या हाती एक मोठ्ठा चित्रपट लागला, असे मानायला हरकत नाही.

 ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे पे्रम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. आलिया रणवीरच्या प्रेयसीची तर करिना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. जान्हवी कपूर विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. ‘धडक’नंतर जान्हवीचा हा दुसरा चित्रपट असेल.

 

Web Title: janhvi kapoor signed dharma productions film which is based on the life of gujan saxena the first woman iaf chopper pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.