जान्हवी कपूर स्वीकारणार का ‘बाहुबली’च्या दिग्दर्शकाची आॅफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 07:58 AM2018-07-27T07:58:09+5:302018-07-27T07:58:09+5:30

ताजी चर्चा खरी मानाल तर ‘धडक’नंतर जान्हवीच्या हाती एक मोठा चित्रपट लागू शकतो.

janhvi kapoor approach by bahubali director ss rajamouli for upcoming film rrr | जान्हवी कपूर स्वीकारणार का ‘बाहुबली’च्या दिग्दर्शकाची आॅफर?

जान्हवी कपूर स्वीकारणार का ‘बाहुबली’च्या दिग्दर्शकाची आॅफर?

googlenewsNext

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिचा डेब्यू सिनेमा ‘धडक’ सध्या बॉक्सआॅफिसवर गर्दी खेचतो आहे. ५० कोटींच्या कमाईकडे या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. साहजिकचं जान्हवीसाठी ही प्रचंड आनंदाचा क्षण आहे. हा आनंद साजरा करत असतानाच जान्हवीच्या दुसऱ्या चित्रपटाचीही चर्चा सुरु झाली आहे. ताजी चर्चा खरी मानाल तर ‘धडक’नंतर जान्हवीच्या हाती एक मोठा चित्रपट लागू शकतो. होय, ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या नव्या चित्रपटात जान्हवी दिसू शकते.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, राजमौली यांनी आपल्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटासाठी जान्हवीशी संपर्क साधला आहे. सगळे काही जुळून आले तर जान्हवी या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसू शकते. अर्थात अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. एका अन्य चर्चेनुसार, साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभु हिलाही हा चित्रपट आॅफर केला गेला आहे.
राजमौलीच्या या चित्रपटात एन टी आर ज्युनिअर आणि रामचरण लीड रोलमध्ये आहेत. हे दोन्ही सुपरस्टार यात भावाच्या भूमिकेत असतील. यातला एक पोलिस अधिकारी तर दुसरा गँगस्टर असेल. तूर्तास राजमौली आणि त्यांचे वडील विजेंद प्रसाद चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.
काल-परवाच जान्हवीच्या आगामी चित्रपटाबद्दल एक वेगळी बातमी कानावर आली होती. जान्हवी आपल्या होमप्रॉडक्शनच्या चित्रपटात दिसणार आणि पापा बोनी कपूर यांनी जान्हवीसाठी काही खास प्लानिंग केले आहे, असे कानावर आले होते. आता खरे काय, हे लवकरच कळेल़ तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच. तूर्तास बोनी कपूर यांनी याबाबतचा प्लान उघड केलेला नाही. पण जान्हवीसाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘जान्हवीचा दुसरा चित्रपट तिच्या ‘धडक’ इमेजच्या अगदी वेगळा असावा, असे त्यांचे मत आहे.
 ‘धडक’बद्दल सांगायचे तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सआॅफिसवर जोरदार सुरूवात केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८ कोटी ७१ लाख कमावले. दुसऱ्या दिवशी ११.४ कोटी तर तिस-या दिवशी १३. ९२ कोटींचा गल्ला जमवला.

Web Title: janhvi kapoor approach by bahubali director ss rajamouli for upcoming film rrr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.