'आँखे' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये जॅकी चॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:51 PM2018-08-24T16:51:57+5:302018-08-24T17:08:47+5:30

अमिताभ बच्चन यांचा 'आँखे' चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jackie Chan in 'Aankhey' movie sequel? | 'आँखे' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये जॅकी चॅन?

'आँखे' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये जॅकी चॅन?

googlenewsNext
ठळक मुद्दे 'आँखे'च्या सिक्वलमध्ये दिसू शकतात सुशांत सिंग राजपूत व विकी कौशल 'आँखे'च्या सीक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिस बझ्मी यांच्यावर

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'आँखे' चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सूत्रांकडून समजते आहे की या चित्रपटात जॅकी चॅनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


अनिस बझ्मी यांच्यावर 'आँखे' चित्रपटाच्या सीक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देण्यात येणार आहे. २००२मध्ये आलेला 'आँखे' हा एक थरारपट होता. निवृत्त बँकर असलेले विजय सिंग राजपूत आपल्या एका अपमानाचा बदला घेण्यासाठी तीन अंधांना बँक दरोड्याचे प्रशिक्षण देतात. त्यासाठी ते अपहरण, खून असे अनेक गुन्हेही पचवतात आणि त्या तीन अंधांकरवी दरोडा घडवूनही आणतात. पण, तो डाव त्यांच्यावरच उलटतो, अशी त्या चित्रपटाची कथा होती. या चित्रपटात विजय सिंग राजपूत, अमिताभ बच्चन, सुश्मिता सेन, अक्षय कुमार, अर्जुन रामपाल आणि परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
आता 'आँखे'च्या सिक्वलमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि विकी कौशल मुख्य भूमिकांमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. तसेच यावेळी बँकेऐवजी कॅसिनो दाखवण्यात येणार असून त्याच्या मालकाच्या भूमिकेत जॅकी चॅन दिसू शकतात. या चित्रपटाचे चित्रीकरण २०१९ मध्ये सुरू होणार असून २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'अाँखे'च्या सिक्वेलमध्ये कोण-कोण कलाकार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Web Title: Jackie Chan in 'Aankhey' movie sequel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.