हेरा फेरी ३ या चित्रपटाविषयी इंद्र कुमार यांनी केली ही खास घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 04:47 PM2019-02-28T16:47:43+5:302019-02-28T16:55:13+5:30

फिर हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत.

Hera Pheri 3 : Akshay Kumar, Suniel Shetty, Paresh Rawal to begin shooting soon | हेरा फेरी ३ या चित्रपटाविषयी इंद्र कुमार यांनी केली ही खास घोषणा

हेरा फेरी ३ या चित्रपटाविषयी इंद्र कुमार यांनी केली ही खास घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देगेले तीन महिने मी टोटल धमाल या चित्रपटावर काम करत असल्याने मला हेरा फेरीकडे लक्ष देता आले नाही. पण आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आम्ही वर्षाअखेरीस सुरुवात करणार आहोत.

हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या तिकडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर याच तिकडीला घेऊन निर्मात्यांनी फिर हेरा फेरी हा हेरी फेरीचा दुसरा भाग बनवला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

फिर हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल झळकणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची केवळ वन लाईन ऐकून त्या तिघांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार करणार असून टोटल धमाल या चित्रपटानंतर आता लवकरच ते हेरा फेरी ३ या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

टोटल धमाल या चित्रपटात माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला समीक्षकांनी नाकारले असले तरी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा पल्ला गाठणार आहे. 

हेरा फेरी ३ या चित्रपटाविषयी डीएनएला दिलेल्या मुलाखतीत इंद्र कुमार यांनी सांगितले आहे की, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची तिकडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे याचा मला आनंद होत आहे. गेले तीन महिने मी टोटल धमाल या चित्रपटावर काम करत असल्याने मला हेरा फेरीकडे लक्ष देता आले नाही. पण आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आम्ही वर्षाअखेरीस सुरुवात करणार आहोत. टोटल धमालमध्ये वीएफएक्सवर काम केल्यानंतर मी या तंत्राच्या प्रेमात पडलो आहे. त्यामुळे हेरा फेरी मध्ये देखील याचा मी मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट अधिक भव्य असणार असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. 

Web Title: Hera Pheri 3 : Akshay Kumar, Suniel Shetty, Paresh Rawal to begin shooting soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.