प्रतीक्षा संपली; ‘हा’ असेल आमिर खानचा नवा चित्रपट!  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:07 PM2019-03-14T15:07:01+5:302019-03-14T15:07:38+5:30

होय, आज आमिरने  त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली.

forrest grump remake will be aamir khans next film | प्रतीक्षा संपली; ‘हा’ असेल आमिर खानचा नवा चित्रपट!  

प्रतीक्षा संपली; ‘हा’ असेल आमिर खानचा नवा चित्रपट!  

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘ठग्स  ऑफ हिंदोस्तान’ दणकून आपटला. पण तरिही आमिर खानचा आगामी चित्रपट कोणता असेल, याबद्दलची चाहत्यांची उत्सुकता लपून राहिली नाही. तेव्हा वेळ आलीय. आमिरच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालीय. होय, आज आमिरने  त्याच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव असेल, ‘लाल सिंग चड्ढा’.

आमिरचा आगामी चित्रपट हा एका ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असेल. या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचे नाव आहे, ‘फॉरेस्ट गम्प’. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ऑस्कर जिंकला होता. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. आणखी एक खास सरप्राईज म्हणजे, यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी आमिरला तब्बल २० किलो वजन कमी करायचे आहे.
आज आमिरने मीडियासोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने आपल्या नवया चित्रपटाची घोषणा केली. माझ्या प्रॉडक्शन हाऊसने ‘फॉरेस्ट गम्प’चे हक्क खरेदी केले आहेत. लवकरच या चित्रपटात काम सुरु होईल. या चित्रपटातील भूमिकेसाठी मला २० किलो वजन कमी करायचे आहे. येत्या सहा महिन्यांत मी यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आमिरने  यावेळी सांगितले.


 

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम केली होती.
 ‘लाल सिंग चड्ढा’आधी आमिरने अनेक चित्रपटांतील लूकसाठी खास मेहनत घेतली. गजनी, धूम 3, मंगल पांडे यासारख्या अनेक चित्रपटांतील त्याचे लूक खास होते आणि या सर्व भूमिकांसाठी आमिरला जिममध्ये बराच घाम गाळावा लागला होता.  ‘लाल सिंग चड्ढा’मधील आपल्या भूमिकेत जीव ओतण्यासाठीही आमिर कुठलीही कसर सोडणार नाही, हा विश्वास आहेच.

Web Title: forrest grump remake will be aamir khans next film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.