सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:40 PM2019-01-08T15:40:00+5:302019-01-08T15:40:46+5:30

‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली याचे पदार्पण फसले. ‘हिरो’ बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सूरज कुठेच दिसला नाही. पण आता उण्यापु-या तीन वर्षांनंतर सूरज मोठ्या पडद्यावर परतणार आहे.

First Poster Out! Sooraj Pancholi's 'Satellite Shankar' to release on 5th July | सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!!

सॅटेलाईट शंकर ! तीन वर्षांनंतर सूरज पांचोलीला मिळाला चित्रपट!!

googlenewsNext
ठळक मुद्दे होय, ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटात सूरज पांचोली झळकणार आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज झालेत.

‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू करणारा अभिनेता सूरज पांचोली याचे पदार्पण फसले. ‘हिरो’ बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सूरज कुठेच दिसला नाही. पण आता उण्यापु-या तीन वर्षांनंतर सूरज मोठ्या पडद्यावर परतणार आहे. होय, ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटात सूरज पांचोली झळकणार आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज झालेत. सूरजने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केले आहेत. ‘एका असामान्य प्रवासाचा शुभारंभ...’असे सूरजने हे पोस्टर्स शेअर करताना लिहिले आहे.





यातील पहिल्या पोस्टरमध्ये भगवान शिवाची प्रतिमा दिसतेय. अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज याचा ‘सॅटेलाईट शंकर’ हा आगामी चित्रपट इरफान कमाल दिग्दर्शित करतोय. या चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप कुठलाही खुलासा झालेला नाही. तसेच सूरजच्या अपोझिट कोणती हिरोईन दिसणार, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. पण सूरज या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सूक आहे आणि असायलाही हवा.



बुडती नौका सावरण्यासाठी सूरजला सर्वप्रथम चित्रपट मिळणे गरजेचे आहे आणि यानंतर ते हिट होणे गरजेचे आहे. आता ‘सॅटेलाईट शंकर’ सूरजच्या करिअरला कशी गती देतो, ते बघूच. काही दिवसांपूर्वीच सूरज ट्विटरवर परतला आहे. २०१७ मध्ये सूरजने ट्विटरला रामराम ठोकला होता. अभिनेत्री कंगना राणौतने सूरजचे पिता आदित्य पांचोलीवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. या आरोपानंतर संतापून सूरजने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता नवा चित्रपट म्हटल्यावर प्रमोशनही आलेच आणि यासाठी ट्विटरही आलेच. त्यामुळे सूरज पुन्हा एकदा ट्विटरवर परतला आहे.

Web Title: First Poster Out! Sooraj Pancholi's 'Satellite Shankar' to release on 5th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.