शाहिद कपूरचा मुलगा झेनचा फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:35 PM2018-11-10T12:35:11+5:302018-11-10T12:40:59+5:30

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर झेनचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत एक कॅप्शन लिहिली आहे.

First Picture of Mira Rajput and Shahid Kapoor's Son Zain Kapoor is Winning the Internet | शाहिद कपूरचा मुलगा झेनचा फोटो तुम्ही पाहिला का?

शाहिद कपूरचा मुलगा झेनचा फोटो तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
ठळक मुद्देमीराने शेअर केलेल्या या फोटोत झैनने मरून रंगाचे कपडे घातले असून त्यात तो खूपच छान दिसत आहे. या फोटोला केवळ एका तासात दीड लाखाहूून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शाहिदचा भाऊ इशान खत्तरनेच या फोटोवर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट केले आहे. झेन खूपच गोड असल्याचे शाहिदचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.

शाहिद कपूरने त्यांचा मुलगा झेनचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर झेनचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत एक कॅप्शन लिहिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हेलो वर्ल्ड... 

मीराने शेअर केलेल्या या फोटोत झैनने मरून रंगाचे कपडे घातले असून त्यात तो खूपच छान दिसत आहे. या फोटोला केवळ एका तासात दीड लाखाहूून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शाहिदचा भाऊ इशान खत्तरनेच या फोटोवर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट केले आहे. त्याने जान बच्चा असे त्याच्या पुतण्याच्या फोटोवर कमेंट केले आहे. झेनचा हा फोटो सोशल मीडियावर सगळ्यांनाच आवडत आहे हे फोटोला मिळत असलेल्या लाइक्स आणि कमेंट्सवरून कळत आहे. झेन खूपच गोड असल्याचे शाहिदचे फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच झेन हा शाहिदचीच दुसरी कॉपी असल्याचे देखील काहींनी म्हटले आहे. झेनच्या प्रेमात शाहिदचे फॅन्स पडले आहेत. 

शाहिद कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या मुलाचे नाव सगळ्यांना सांगितले होते. त्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर ट्वीट करून म्हटले होते की, झेन आमच्या आयुष्यात आल्याने आमचे कुटुंब आता पूर्ण झालेले आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या शुभेच्छांसाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. असेच प्रेम आमच्यावर करत राहा... लव्ह यू ऑल.

शाहिदच्या पत्नीचे नाव मीरा असून त्या दोघांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. झेन हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. मीराची आई बेला, शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर, भाऊ ईशान खट्टर झेनच्या जन्माच्या वेळी रुग्णालयात होते. शाहिद कपूरने झेनच्या जन्मानंतर पालकत्वाची सुट्टी घेतली होती आणि तो जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत होता. या सुट्टीमुळेच शाहिद कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले होते.

Web Title: First Picture of Mira Rajput and Shahid Kapoor's Son Zain Kapoor is Winning the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.