Taimur Ali Khan चे हे फोटो तुम्ही पाहिले का?, ‘मेरा नाम जोकर’ सिनेमातील ऋषी कपूर तुम्हाला आठवतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 11:57 AM2018-10-05T11:57:01+5:302018-10-05T12:06:45+5:30

तैमुरच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात.

Do you see this photo of Taimur Ali Khan? You will remember Rishi Kapoor in 'My Name Joker'. | Taimur Ali Khan चे हे फोटो तुम्ही पाहिले का?, ‘मेरा नाम जोकर’ सिनेमातील ऋषी कपूर तुम्हाला आठवतील!

Taimur Ali Khan चे हे फोटो तुम्ही पाहिले का?, ‘मेरा नाम जोकर’ सिनेमातील ऋषी कपूर तुम्हाला आठवतील!

googlenewsNext

बॉलीवुडमध्ये स्टार किड्सची चर्चा होणं काही नवं नाही. मग सुपरस्टार्सच्या मुला-मुलींची बॉलीवुडमध्ये एंट्री असो किंवा त्यांचं खासगी जीवन. त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. या सगळ्या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. 

करीना कपूरचा वंडरबॉय असलेल्या तैमूरमध्ये कपूर घराण्याचे काही ना काही अनुवांशिक अंश असणारच. त्यामुळे कपूर घराण्यापैकी कुणासारखा तरी तैमूर दिसतो असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविकच आहे. कुणी म्हणतं की तैमूर त्याचे आजोबा रणधीर कपूर यांच्यासारखा दिसतो तर कुणाला बिल्कुल तसं वाटणार नाही. काहींना तैमूर त्याच्या वडिलांची म्हणजेच छोटे नवाब सैफची छबी असल्यासारखं वाटेल. 

आता नेमका तैमूर कुणासारखा दिसतो हे ठरवण्यासाठी तुम्हाला आणखी काही काळ लागेल. मात्र आता तैमूरचे असे काही फोटो समोर आलेत की तुम्ही त्याची कपूर घराण्यातील एका बड्या व्यक्तीशी तुलना केल्याशिवाय राहूच शकत नाही. या फोटोतील तैमूरचा लूक तुम्हाला 'मेरा नाम जोकर' सिनेमातील ऋषी कपूर यांच्याशी मिळताजुळता आहे. मेरा नाम जोकर सिनेमातील ऋषी कपूर आणि तैमूरचे नवे फोटो यांत कमालीचे साम्य आहे.

 

तेच करडे डोळे, हेअरस्टाईल काहीशी तशीच आणि अगदी ऋषी कपूर यांच्यासारखं तसंच स्मितहास्य… सारं काही पाहून तुम्हालाही तैमूर आणि मेरा नाम जोकर सिनेमातील ऋषी कपूर यांच्यात साम्य दिसून येईल.

तैमूरचे हे फोटो तुम्हाला ४८ वर्षे मागे घेऊन जातीलच आणि रुपेरी पडद्यावरील मेरा नाम जोकरमधील तो कोवळा ऋषी कपूर आठवल्याशिवाय राहणार नाही. तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय.काही दिवसांपूर्वी बेगम करीना कपूर तैमूरसह आपली मैत्रीण अमृता अरोरा हिच्या घरी गेली होती. त्यावेळी कारमधून उतरुन बेबो अमृताच्या घराकडे जायला निघाली.त्यावेळी आपल्या आईचं असं जाणं तैमूरला खटकलं. मग तैमूर आपल्या आईकडे जाण्यासाठी हट्ट करु लागला.आईनं आपल्याला कुशीत घ्यावे यासाठी तो हट्ट करु लागला. त्याचा बालहट्ट असा काही होता की त्याचा सांभाळ करणा-या केअरटेकरलाही तैमूरला सांभाळणं कठीण झालं होतं. तैमूरच्या याच बाललीलांचे काही फोटो समोर आलेत. आपल्या आईच्या कुशीत जाण्यासाठी तैमूर कसा हट्ट करतोय ते या फोटोत पाहायला मिळतंय.


 

Web Title: Do you see this photo of Taimur Ali Khan? You will remember Rishi Kapoor in 'My Name Joker'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.