लहानपणी अशी दिसायची 'बाहुबली'ची ही 'देवसेना',फोटो सोशल मीडियावर केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 07:38 AM2017-10-26T07:38:52+5:302017-10-26T13:08:52+5:30

बालपणी प्रत्येकजण धम्माल करतो.ही बालपणीची धम्माल मस्ती फोटोत कैद असते. फोटोमधूनच प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो.आजवर आपण ब-याच ...

In this childhood, 'DevSena' of 'Bahubali' was shared on social media | लहानपणी अशी दिसायची 'बाहुबली'ची ही 'देवसेना',फोटो सोशल मीडियावर केला शेअर

लहानपणी अशी दिसायची 'बाहुबली'ची ही 'देवसेना',फोटो सोशल मीडियावर केला शेअर

googlenewsNext
लपणी प्रत्येकजण धम्माल करतो.ही बालपणीची धम्माल मस्ती फोटोत कैद असते. फोटोमधूनच प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो.आजवर आपण ब-याच कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिले आहेत.आता पुन्हा एकदा एका अभिनेत्रीचे बालणीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.बाहुबली सिनेमात देवसेना भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे हे फोटो आहेत.अनुष्काने तिचा हा शाळेतला पासपोर्ट फोटो सोशल मीडियावर अपलोड करताच तिला अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोतला चिमुकल्या अनुष्काचा गोंडस अवतार तुम्हालाही प्रेमात पाडेल असाच आहे.चिमुरड्या अनुष्काचे बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.



‘बाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे.हिंदीसह अनेक तेलुगू आणि तमिळ सिनेमात अनुष्का झळकली आहे. स्वीटी शेट्टी असं खरं नाव असलेल्या अनुष्काचा जन्म 7 नोव्हेंबर 1981मध्ये झाला आहे. 2005 साली आलेल्या सुपर या तेलुगू सिनेमातून अनुष्काने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अनुष्काने बाहुबली या सिनेमासह विक्रमारकुडू, अरुंधती, वेदम, रुद्रमादेवी, सिंघम सीरीज अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. एका सिनेमासाठी अनुष्का जवळपास 4 ते 5 कोटी रुपये इतकं मानधन स्वीकारते.बाहुबली पहिल्य भागाला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतर बाहुबाली पार्ट -2 ही गाजला.सिनेमाप्रमाणेच सिनेमातील कलाकारांविषयीच्या चर्चा मात्र कुठेच थांबण्याच नाव घेत नाही.‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. आता तर दोघेही लग्न करणार, इथपर्यंत चर्चा रंगलीयं.   आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे दोघेही सांगत आले आहेत.मात्र आता दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबूली उघडपणे द्यावी अशीच दोघांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. तुर्तास या सगळ्या गोष्टी मागे सारत अनुष्का मात्र तिच्या बालणीच्या आठवणीत रममाण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: In this childhood, 'DevSena' of 'Bahubali' was shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.