Cannes 2018 : कान्समध्ये पिंजऱ्यात कैद झाली मल्लिका शेरावत; म्हटले, ‘सपोर्ट करा’, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 10:39 AM2018-05-15T10:39:30+5:302018-05-15T16:09:36+5:30

सध्या कान्स २०१८ ची धूम सुरू असून, त्यात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. याठिकाणी केवळ फॅशनच नव्हे तर समाजातील गंभीर मुद्द्यांना प्रखरतेने मांडण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

Cannes 2018: Mallika Sherawat imprisoned in cage in Cannes; Said, 'support', watch the video! | Cannes 2018 : कान्समध्ये पिंजऱ्यात कैद झाली मल्लिका शेरावत; म्हटले, ‘सपोर्ट करा’, पाहा व्हिडीओ!

Cannes 2018 : कान्समध्ये पिंजऱ्यात कैद झाली मल्लिका शेरावत; म्हटले, ‘सपोर्ट करा’, पाहा व्हिडीओ!

googlenewsNext
व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१८ मध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सहभागी होत आपला जलवा दाखविला. नुकतेच लग्न करून कान्समध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री सोनम कपूर आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन यांची रेड कार्पेटवरील एंट्री विशेष आकर्षक ठरली. यावेळी कान्समध्ये पाहोचलेल्या अभिनेत्री मल्लिका शेरावतचाही जलवा बघण्यासारखा होता. दरम्यान, मल्लिकाने कान्समधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्यामध्ये ती एका पिंजºयात कैद असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मल्लिका जगभरातील लोकांना संदेश देताना दिसत आहे. 

दरम्यान, लहान मुलांवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबविले जावेत हा संदेश देण्यासाठीच मल्लिकाने स्वत:ला पिंजºयात कैद केले. तिने ‘लॉक-मी-अप’ या कॅम्पेनचा भाग बनून चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि प्रोस्टिट्यूशन विरोधात आवाज उठविला. या मुद्द्यावर जगभरातील लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी होऊच शकत नाही, असे म्हणत मल्लिकाने स्वत:ला पिंजºयात कैद करून काही फोटो काढले. मल्लिका ‘फ्री अ गर्ल इंडिया इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे. ही संस्था मानव तस्करी आणि मुलांवर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम करीत असते. 
 

मल्लिकाने कान्समध्ये स्वत:ला १२ बाय ८ फुटाच्या एका छोट्याशा पिंजºयात कैद करून घेतले. तसेच ‘फ्री अ गर्ल’ या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याची लोकांना अपीलही केली. हॅशटॅगसह लोक या मुद्द्यावर आपले मत मांडत आहेत. मल्लिकाने म्हटले की, ‘कान्समध्ये हे माझे नववे वर्ष आहे आणि हे फेस्टिव्हल केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील बाल वेश्यावृत्तीविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वांत यशस्वी व्यासपीठ आहे. एका पिंजºयात स्वत:ला कैद करून मी याविषयीची कल्पना करू इच्छित होती की, कशाप्रकारे तरुण मुलींची तस्करी केली जात आहे. ती कशापद्धतीने १२ बाय ८ फुटाच्या पिंजºयात फसली आहे.’ 

मल्लिकाने पुढे बोलताना म्हटले की, ‘या निर्दोष मुलांना कुठल्याही मदत आणि आधाराविना जगावे लागत आहे. कुठल्याही बदलाची आणि मदतीची अपेक्षा न करता या तरुणींना कशाप्रकारे प्रत्येक मिनिटाला दूरव्यवहाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच मी माझ्या वाट्याला आलेली जबाबदारी पार पाडण्याची आणि याविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक असा मुद्दा आहे, ज्याचा लवकरात लवकर समूळ नाश करण्याची गरज आहे. 

Web Title: Cannes 2018: Mallika Sherawat imprisoned in cage in Cannes; Said, 'support', watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.