Birthday Special : पाहा, मॉडेलिंग काळातील दीपिका पादुकोणचा ‘नॉट सो कूल’ लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 06:00 AM2019-01-05T06:00:00+5:302019-01-05T06:00:03+5:30

आजघडीला दीपिका पादुकोण  बॉलिवूडची टॉपमोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुंदर आणि ग्लॅमरस दीपिकाचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. दीपिकाच्या सौदर्यात डिझाईनर्स, मेकअप आर्टिस्ट,स्टाईलिस्ट यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळेच स्ट्रगलिंग काळातील दीपिकाला तुम्ही ओळखूही शकणार नाही.

Birthday Special: Deepika Padukone in modeling pose | Birthday Special : पाहा, मॉडेलिंग काळातील दीपिका पादुकोणचा ‘नॉट सो कूल’ लूक!!

Birthday Special : पाहा, मॉडेलिंग काळातील दीपिका पादुकोणचा ‘नॉट सो कूल’ लूक!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ओम शांती ओम’ या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ या कॅटेगरीत फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

आजघडीला दीपिका पादुकोण  बॉलिवूडची टॉपमोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुंदर आणि ग्लॅमरस दीपिकाचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. दीपिकाच्या सौदर्यात डिझाईनर्स, मेकअप आर्टिस्ट,स्टाईलिस्ट यांचा खूप मोठा वाटा आहे. कॉस्मेटिक सर्जरीनंतर दीपिका आणखीच सुंदर दिसू लागली आहे. त्यामुळेच स्ट्रगलिंग काळातील दीपिकाला तुम्ही ओळखूही शकणार नाही. मॉडेलिंग काळातील दीपिका पाहिल्यानंतर आजची दीपिका हीच का? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी दीपिका हिचा जन्म कोपनहेगन येथे झाला. बंगळुरु येथे तिने तिचे शिक्षण आणि बॅडमिंटनवरील प्रेम संपादित केले. किशोरवयीन वयात असताना ती राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळली. मात्र, मॉडेल होण्याचा मार्ग स्वीकारल्याने तिला बॅडमिंटनपटू होण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले. 

चित्रपटांत येण्यापूर्वी दीपिका मॉडेल होती. कॉलेजच्या दिवसांपासूनच तिने मॉडेलिंग सुरु केले होते. बेंगळुरुच्या नॅशनल लॉ कॉलेजमध्येही तिने रॅम्प वॉक केला होता. पुढे हीच दीपिका लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोजअप, लिम्का या नावाजलेल्या ब्रॅण्डची ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर बनली.

२००६ हे वर्ष दीपिकासाठी खास म्हणायला हवे. कारण याच वर्षी ती किंगफिशर कॅलेंडर गर्ल बनली. तिला मॉडेल आॅफ द ईअर म्हणून निवडले गेले. किंगफिशर स्विमसूट कॅलेंडरमध्ये ती सिलेक्ट झाली.

हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’मध्ये दिसली. तोपर्यंत दीपिकाचा बॉलिवूडमध्ये येण्याचा इरादा पक्का झाला होता. अनेक संघर्र्षानंतर २००६ मध्ये तिला कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ची आॅफर मिळाली. मात्र, बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू चित्रपट २००७ मध्ये  झाला.

‘ओम शांती ओम’ या पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ या कॅटेगरीत फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Web Title: Birthday Special: Deepika Padukone in modeling pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.