अखेर बिपाशा बासूची होणार ‘वापसी’! पतीसोबत करणार धडाकेबाज कमबॅक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 07:03 PM2018-08-31T19:03:31+5:302018-08-31T19:03:46+5:30

बॉलिवूडचे सर्वाधिक सेक्सी कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी खबर आहे. होय, बिपाशा व करण कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत.

bipasha basu and karan singh grover team up for aadat | अखेर बिपाशा बासूची होणार ‘वापसी’! पतीसोबत करणार धडाकेबाज कमबॅक!!

अखेर बिपाशा बासूची होणार ‘वापसी’! पतीसोबत करणार धडाकेबाज कमबॅक!!

googlenewsNext

बॉलिवूडचे सर्वाधिक सेक्सी कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी खबर आहे. होय, बिपाशा व करण कमबॅकसाठी सज्ज झाले आहेत. ‘आदत’ या चित्रपटातून बिपाशा व करण दोघेही कमबॅक करणार असल्याचे कळतेय. या चित्रपटात बिपाशा स्वभावाने खडूश अशा लंडन पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिचा हबी करण एका एनआरआय बिझनेसमनची भूमिका वठवणार आहे. येत्या १४ सप्टेंबरपासून चित्रपटाचे शूटींग सुरू होतेय. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून ‘अलोन’चे दिग्दर्शक भूषण पटेल हेच याचे दिग्दर्शन करणार आहेत. सिंगर मिका सिंग याने हा थ्रीलर चित्रपट प्रोड्यूस केला आहे. ‘आदत’ बहुतांश शूटींग लंडनमध्ये होणार आहे.
२०१५ मध्ये भूषण पटेल यांनीच ‘अलोन’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. या हॉरर चित्रपटात बिपाशा बासू करण सिंग ग्रोव्हर दोघेही लीड भूमिकेत होते. विशेष म्हणजे, याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशा व करण एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर बिपाशा व करण दोघेही कुठल्याच चित्रपटात दिसले नाहीत. ‘अलोन’ हा दोघांचाही अखेरचा चित्रपट होता. पण आता हे रिअल लाईफ कपल परततेय. त्यांचे हे कमबॅक किती यशस्वी ठरते ते बघूच.

Web Title: bipasha basu and karan singh grover team up for aadat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.