कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता बिंदू यांनी केले होते चंपकलाल झवेरी यांच्यासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:42 PM2018-09-04T12:42:08+5:302018-09-04T13:29:33+5:30

बिंदू आणि त्यांचे पती चंपक जवेरी यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. बिंदू या शाळेत असतानाच त्यांची आणि चंपक यांची ओळख झाली होती. मुंबईत ते बिंदू यांचे शेजारी होते.

bindu and champaklal zaveri love story | कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता बिंदू यांनी केले होते चंपकलाल झवेरी यांच्यासोबत लग्न

कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता बिंदू यांनी केले होते चंपकलाल झवेरी यांच्यासोबत लग्न

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यांचा अभिनय, नृत्य यावर त्यांचे फॅन्स आजही फिदा आहेत. त्यांनी अनपढ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाच्या वेळी त्या केवळ 11 वर्षांच्या होत्या. त्यांनी या चित्रपटात माला सिन्हा यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. बिंदू यांच्या आई या अभिनेत्री होती, त्यांना स्टेजवर पाहून बिंदू यांनी देखील अभिनय क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले. पण त्यांनी डॉक्टर बनावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र बिंदू या खूपच लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना सात बहिणी आणि एक भाऊ होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी मॉडलिंगला सुरुवात केली आणि तिथून त्या अभिनयक्षेत्रात आल्या. 

बिंदू आणि त्यांचे पती चंपक जवेरी यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. बिंदू या शाळेत असतानाच त्यांची आणि चंपक यांची ओळख झाली होती. मुंबईत ते बिंदू यांचे शेजारी होते. त्यांच्या दोघांच्या वयात पाच वर्षांचे अंतर होते. काही वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी कुटुंबियांचा विरोध पत्करून लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच त्यांना राजेश खन्नासोबत दो रास्ते या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने त्यांचे करियरच बदलले. यानंतर त्यांना इत्तेफाक, डोली, आया सावन झूम के यांसारखे चित्रपट मिळाले. 

बिंदू सध्या बॉलिवूडपासून दूर त्यांच्या पतीसोबत पुण्यात राहातात. त्या डर्बीच्या सदस्या असून त्या अनेकवेळा पुण्याच्या रेस कोर्स मध्ये दिसतात. बिंदू यांना मूलबाळ नाहीये. बिंदू यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते, मी गरोदर असल्याने तिसऱ्या महिन्यापासूनच काम करणे बंद केले होते. पण सातव्या महिन्यात माझे मिसकॅरेज झाले. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी आणि माझे पती दोघेही डिप्रेशनमध्ये गेलो होतो. पण प्रत्येक व्यक्तीला सगळे काही मिळत नाही असा विचार करत आम्ही पुन्हा कामाला सुरुवात केली. 
 

Web Title: bindu and champaklal zaveri love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.